हायलाइट्स:

  • बार्शीकरांची कोट्यवधी रूपयांची फसवणूक केल्याचा आरोप
  • विशाल फटे सोलापूर ग्रामीण पोलिसांसमोर शरण
  • उद्या न्यायालयात हजर केलं जाणार

सोलापूर : शेअर मार्केटच्या हवाल्याने बार्शीकरांची कोट्यवधी रूपयांची फसवणूक केल्याचा आरोप असलेला विशाल फटे आज स्वतः हून सोलापूर ग्रामीण पोलिसांसमोर शरण आला आहे. याची अधिकृत माहिती सोलापूरच्या पोलीस अधीक्षक तेजस्वी सातपुते यांनी पत्रकारांना दिली. (बार्शी महाराष्ट्र)

सोलापूरच्या पोलीस अधीक्षक कार्यालयात हजर होण्यापूर्वी विशाल फटे याने आज सकाळी एक व्हिडिओ जारी करत आपली बाजू मांडण्याचा प्रयत्न केला होता. त्यात त्याने आपण आज सायंकाळी जवळच्या पोलीस ठाण्यात पोलिसांच्या स्वाधीन होणार असल्याचं म्हटलं होतं. त्यानुसार फटे हा अन्य पोलीस ठाण्यात न जाता थेट एसपी कार्यालयात येऊन हजर झाला आहे. त्याची वैद्यकीय चाचणी करून उद्या न्यायालयात हजर केलं जाणार आहे.

Supreme Court: करोनाने मृत्यू झाल्यास ‘या’ पद्धतीने अंत्यसंस्कारास नकार; सुप्रीम कोर्ट काय म्हणालं?

विशाल फटे याच्याविरोधात बार्शी शहर पोलीस ठाण्यात आतापर्यंत ३५ गुंतवणूकदारांनी फसवणुकीची फिर्याद दिली आहे. त्यात जवळपास १८ कोटी रुपयांची फसवणूक झाल्याचे म्हटलं आहे.

‘देश सोडून पळून जाण्याचा विचार नव्हताच’

मागील काही दिवसांपासून विशाल फटे हा गायब असल्याने तो विदेशात पळून गेल्याची चर्चा बार्शी परिसरात सुरू झाली होती. मात्र सोमवारी त्याने जारी केलेल्या व्हिडिओत संपूर्ण प्रकरणाबाबत स्पष्टीकरण दिलं. ‘लोकांची फसवणूक करण्याचा किंवा देश सोडून पळून जाण्याचा माझा कोणताही उद्देश नव्हता. मात्र मी पैसे जमा करण्यासाठी काही दिवस बाहेर असल्याने लोकांनी अफवा पसरवल्या. मी जो व्यवसाय केला त्यात कुटुंबातील कुठल्याच सदस्याचा सहभाग नव्हता. फक्त कागदोपत्री ते संचालक होते,’ असं त्याने म्हटलं आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here