हायलाइट्स:
- लाचखोर पोलीस कर्मचारी अटकेत
- बांधकाम व्यावसायिकाकडे मागितली होती लाच
- पोलीस ठाण्यात गुन्हा नोंदवण्यात आला
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, तक्रारदार धीरज अनिल साखळकर (वय ३७, रा. नागाळा पार्क) हे बांधकाम व्यावसायिक असून त्यांच्याविरोधात लक्ष्मीपुरी पोलीस ठाण्यात गुन्हा नोंदवण्यात आला आहे. त्यांच्याविरोधातील गुन्ह्याच्या तपासात मदत करण्यासाठी पोलीस कॉन्स्टेबल मर्दाने याने ५० हजार रुपये लाचेची मागणी केली असून २५ हजार रुपये लाच स्वीकारली आहे.
बांधकाम व्यावसायिक साखळकर यांनी पोलीस कर्मचारी मर्दाने २५ हजार रुपये लाचेची मागणी करत असल्याची तक्रार लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडे केली. त्यांच्या तक्रारीची पोलिसांनी पडताळणी केली. त्यामध्ये मर्दाने याने तक्रारदार साखळकर यांच्याकडून २५ हजाराची लाच स्वीकारल्याचं मान्य करुन आणखी १० हजार रुपये लाचेची मागणी केल्याचं तपासात स्पष्ट झालं. त्यानंतर लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने पोलीस कॉन्स्टेबल मर्दाने यांना ताब्यात घेतलं असून त्यांच्याविरोधात गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू केली आहे.
दरम्यान, पोलीस उपअधीक्षक अदिनाथ बुधवंत यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस हेड कॉन्स्टेबल शरद पोरे, मयूर देसाई, संदीप पडवळ, रुपेश माने यांनी या कारवाईत सहभाग घेतला.