दुबई, संयुक्त अरब अमिरात :

सोमवारी, संयुक्त अरब अमिरातीची (UAE) राजधानी असलेल्या अबुधाबीमध्ये एका ड्रोनसदृश वस्तूनं धडक दिल्यानं लागलेल्या आगीमुळे तीन टँकरचा सोमवारी स्फोट झाला. या दुर्घटनेत दोन भारतीय व एका पाकिस्तानी नागरिकाचा मृत्यू झाला, तर सहा जण जखमी झाले आहेत. ‘यूएई’नं या हल्ल्यासाठी ताबडतोब कोणालाही दोष दिलेला नाही. मात्र, येमेनच्या हुती बंडखोरांनी अधिक तपशील न देता आपणच ‘यूएई’ला लक्ष्य केल्याचा दावा केला आहे. याआधीही या बंडखोरांनी सौदी अरेबिया आणि यूएईवरील अनेक हल्ल्यांची जबाबदारी स्वीकारली आहे. त्यामुळे ‘हुती बंडखोरांची’ पुन्हा एकदा जगभर चर्चा सुरू झालीय.

कोण आहेत ‘हुती बंडखोर‘?

येमेनच्या मोठ्या भागावर हुती बंडखोरांचा ताबा आहे. इथं आंतरराष्ट्रीय स्तरावर मान्यताप्राप्त सरकार पुनकार्यान्वित करण्यासाठी सौदीच्या नेतृत्वाखालील लष्करी युती हुतींविरूद्ध लढा देतेय. येमेनच्या गृहयुद्धात लढण्यासाठी युएई २०१५ मध्ये सौदी युतीमध्ये सामील झाला.

यूएईनं काही आठवड्यांपूर्वीपासून येमेनमधील हुती लक्ष्यांविरूद्ध हवाई मोहीम तीव्र केलीय. हुती बंडखोरांकडून याचा सूड घेण्यात येईल अशी धमकी देण्यात आली होती. सोमवारचे हल्ले याच कारवाईचा भाग असल्याचं मानलं जातंय.

अबुधाबी ड्रोन हल्ला : दोन भारतीयांसहीत तिघांचा मृत्यू, सहा जखमी
Drone Attack: ड्रोनच्या सहाय्यानं अबुधाबी आंतरराष्ट्रीय विमानतळावर दहशतवादी हल्ला
येमेनमध्ये हुतींचा उदय का झाला?

१९८० च्या दशकात येमेनमध्ये हुतींचा उदय झाला. येमेनच्या उत्तर भागातील शिया मुस्लिमांची ही सर्वात मोठी आदिवासी संघटना आहे. उत्तर येमेनमध्ये सुन्नी इस्लामच्या ‘सलाफी विचारसरणी’च्या विस्ताराला हुतींचा विरोध आहे. २०११ पूर्वी येमेनमध्ये सुन्नी नेते अब्दुल्ला सालेह यांचं राज्य असताना शिया समुदायाला दडपशाहीच्या अनेक घटना घडल्या होत्या. अशा स्थितीत सुन्नी समाजाच्या हुकूमशहा नेत्याविरुद्ध शिया लोकांमध्ये संतापाची लाट उसळली.

का उभी राहिली बंडखोरांची संघटना?

मिळालेल्या माहितीनुसार, २००० च्या दशकात विद्रोही सेना उभी राहिल्यानंतर २००४ ते २०१० पर्यंत हुतींनी सालेह यांच्या सैन्याशी सहा वेळा लढा दिला. २०११ मध्ये अरब देशांच्या (सौदी अरेबिया, यूएई, बहरीन आणि इतर) हस्तक्षेपानंतर हे युद्ध शांत झालं. देशातील जनतेच्या निदर्शनांमुळे हुकूमशहा सालेह यांना पायउतार व्हावं लागलं.

यानंतर अब्दारब्बू मन्सूर हादी येमेनचे नवे राष्ट्राध्यक्ष बनले. परंतु देशातील जिहादी अतिरेक्यांचे वाढते हल्ले, दक्षिण येमेनमधील फुटीरतावादी चळवळी, भ्रष्टाचार, बेरोजगारी आणि माजी राष्ट्राध्यक्ष सालेह यांना लष्कराचा पाठिंबा या गोष्टी हादी यांच्यासाठी अडचणीच्या ठरल्या. अखेरीस, जेव्हा हुतींना आपल्या समस्यांचं निराकरण दिसेनासं झालं तेव्हा त्यांनी हादी यांनाही सत्तेतून काढून टाकलं आणि राजधानी सना आपल्या ताब्यात घेतली.

सात भारतीय येमेनच्या हुती बंडखोरांच्या ताब्यात, भारताची संयुक्त राष्ट्राकडे धाव
‘India Out’ Campaign: ‘इंडिया आउट’ मोहीम; मालदीवमधील भारतविरोध शमणार?
सौदी आणि यूएईची चिंता?

शिया समुदायाशी निगडीत हुतींच्या येमेनमधील वाढत्या शक्तीमुळे सुन्नी बहुसंख्य सौदी अरेबिया आणि यूएईमध्ये दहशत निर्माण झाली आहे. त्यामुळे त्यांनी अमेरिका आणि ब्रिटनच्या मदतीनं हुतींविरूद्ध हवाई आणि जमिनी हल्ले सुरू केले तसंच हुतींनी हकालपट्टी केलेल्या हादी यांना पाठिंबा दिला. त्यामुळे येमेन युद्धभूमी बनलंय आणि इथं सौदी अरेबिया, यूएईचे सैन्य हुथी बंडखोरांचा सामना करत आहेत.

इराणचा काय संबंध?

इराणवर येमेनच्या हुतींना मदत पुरवल्याचा आरोप करण्यात येतो. वास्तविक, इराण हा शियाबहुल देश आहे आणि हुती मुस्लिम देखील याच समुदायाशी संबंधित आहेत. तसंच तर इराणचा सौदी अरेबिया आणि यूएईशी पूर्वीपासूनच वाद आहे. त्यामुळे हुती बंडखोरांना इराणचा थेट पाठिंबा असल्याचं म्हटलं जातं.

India Pakistan: पाकिस्तानला झोंबले भारताचे ‘गहू’; ‘पब्लिसिटी स्टंट’ असल्याची टीका
Texas Attack: १० तासांच्या थरारनाट्यानंतर सिनेगॉगमधील ओलिसांची मुक्तता, हल्लेखोर ठार
अबुधाबी ड्रोनहल्ला?

अबुधाबीतील स्फोटासंदर्भात बोलताना, आंतरराष्ट्रीय विमानतळाच्या विस्तारीकरण सुरू असलेल्या भागातही अशाच प्रकारच्या स्फोटामुळे किरकोळ आग लागल्याचं सरकारी वृत्तवाहिनीनं म्हटलंय. सरकारी मालकीच्या अबू धाबी राष्ट्रीय तेल कंपनीच्या (एडीएनओसी) मुसाफह आयसीएडी-३ या भागात लागलेल्या आगीमुळे टँकरचा हा स्फोट झाला. ड्रोनसदृश लहान वस्तूमुळेच तेल कंपनी आणि विमानतळानजिक या आगी लागल्या असल्याचं प्राथमिक तपासात समोर आलं. दोन्ही ठिकाणची आग नियंत्रणात आणण्यात आली असून, दोन्ही दुर्घटनांमुळे कोणतीही मोठी हानी झालेली नाही, अशी या वृत्तवाहिनीनं माहिती दिलीय.

तेल कंपनीत टँकरच्या स्फोटांमुळे दोन भारतीयांसह एका पाकिस्तानी नागरिकाचा मृत्यू झाल्याचं व सहा जण जखमी झाल्याचं पोलिसांनी सांगितलं. मात्र यातील कुणाचीही ओळख उघड करण्यात आलेली नाही. ‘अधिकाऱ्यांनी आगीचं कारण आणि घटनास्थळांच्या आजूबाजूच्या परिस्थितीचा व्यापक तपास सुरू केला आहे’, असंही पोलिसांनी नमूद केलंय.

दरम्यान, दक्षिण कोरियाचे अध्यक्ष मून जे-इन ‘यूएई’च्या दौऱ्यावर असताना या घटना घडल्या आहेत. हा दहशतवादी हल्ला असल्याच्या दिशेनंही तपास केला जात आहे.

भारतीय दूतावास संपर्कात

‘एडीएनओसीच्या साठवणूक टाकीजवळ मुसाफह इथं स्फोट झाल्याची माहिती ‘यूएई’ प्रशासनानं दिलीय. यात दोन भारतीयांचा मृत्यू झाला, असंही सांगण्यात आलं. आम्ही याबाबत अधिक माहिती घेण्यासाठी संबंधित प्रशासनाच्या संपर्कात आहोत’, असं ट्वीट ‘यूएई’मधील भारतीय दूतावासानं केलंय.

Pakistan: ‘माझी शिफ्ट संपली’ सांगत पायलटचा अर्ध्या प्रवासातच विमान उड्डाणास नकार!
Chinas Population: चिनी लोकसंख्येच्या इतिहासाला धक्का; वर्षभरात पाच लाखांहून कमी वाढ

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here