हायलाइट्स:

  • मी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याविषयी काहीही बोललो नाही
  • मी ज्या मोदींचा उल्लेख केला तो गावगुंड आहे
  • भाजप मोदी नावावरुन विनाकारण रान उठवून पंतप्रधानपदाच्या प्रतिष्ठेला धक्का पोहोचवत आहे

मुंबई : काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी (पंतप्रधान नरेंद्र मोदी) यांच्याविषयी आक्षेपार्ह वक्तव्य केल्याचा आरोप करत भाजप पक्ष प्रचंड आक्रमक झाला आहे. राज्यभरात भाजपकडून नाना पटोले यांच्याविरोधात निदर्शने सुरु झाली आहेत. या पार्श्वभूमीवर नाना पटोले (नाना पटोले) यांच्या मुंबईतील बंगल्याबाहेर पोलीस सुरक्षेत वाढ करण्यात आली आहे. मंत्रालयाच्या परिसरात नाना पटोले यांचा ए-९ हा बंगला आहे. नाना पटोले हे विधानसभा अध्यक्ष असताना त्यांना हा बंगला देण्यात आला होता. विधानसभेचे अध्यक्षपद सोडल्यानंतरही नाना पटोले अजूनही याच बंगल्यामध्ये वास्तव्याला आहेत. त्यामुळे भाजपकडून याठिकाणी मोर्चा काढला जाऊ शकतो.

या पार्श्वभूमीवर ए-९ बंगल्याच्या परिसरातील पोलिसांची संख्या वाढवण्यात आली आहे. कोणत्याही अनोळखी व्यक्तीला बंगल्यात प्रवेश दिला जात नाही. तसेच बंगल्याच्या संपूर्ण परिसर पोलिसांनी वेढलेला आहे.

या सगळ्या वादाच्या पार्श्वभूमीवर नाना पटोले यांनी आपली बाजू मांडली आहे. मी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याविषयी काहीही बोललो नाही. मी ज्या मोदींचा उल्लेख केला तो गावगुंड आहे. मात्र, भाजप मोदी नावावरुन विनाकारण रान उठवून पंतप्रधानपदाच्या प्रतिष्ठेला धक्का पोहोचवत आहे. आता काँग्रेसच भाजपविरोधात तक्रार दाखल करेल, असे नाना पटोले यांनी म्हटले.
मोदींवरील टीका भोवणार?; भाजपकडून तक्रार दाखल, पटोलेंच्या घराबाहेरील सुरक्षा वाढवली

मोदींवर टीका करणाऱ्या नाना पटोलेंना अटक करा: नितीन गडकरी

भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील, माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यानंतर आता केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनीही नाना पटोले यांच्यावर निशाणा साधला आहे. नितीन गडकरी यांनी ट्विट करुन यासंदर्भात आपली प्रतिक्रिया दिली आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याविषयी महाराष्ट्र कॉंग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी वापरलेली भाषा अतिशय आक्षेपार्ह व निंदनीय आहे. माझी पोलीस प्रशासनाला विनंती आहे, की पटोलेंवर गुन्हा दाखल करून त्यांना अटक करण्यात यावी, असे ट्विट गडकरी यांनी म्हटले.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here