धनुष आणि रजनीकांतच्या कन्येचा काडीमोड!; १८ वर्षांच्या संसारानंतर…
सिनेमा हॉल आणि पहिली भेट
धनुष आणि ऐश्वर्याची पहिली भेट एका कार्यक्रमादरम्यान झाली होती. २०१५ मध्ये टाइम्स ऑफ इंडियाला दिलेल्या मुलाखतीत धनुषने पहिल्या भेटीची कहाणी सांगितली होती. धनुषने सांगितले होते की, तो त्याच्या ‘Kadhal Kondaen’ या सिनेमाचा पहिला शो पाहण्यासाठी कुटुंबासह गेला होता. मध्यांतर येईपर्यंत सर्वजण एकमेकांना मिठी मारु लागले. धनुषच्या म्हणण्यानुसार, त्याला कल्पना आली होती की हा सिनेमा हिट होणार आहे.
पुष्पगुच्छ पाठवून सांगितले- संपर्कात रहा
धनुष म्हणाला, ‘जेव्हा सिनेमा संपला आणि आम्ही निघायला लागलो, तेव्हा सिनेमाच्या मालकाने माझी ओळख रजनीकांत सरांच्या मुली ऐश्वर्या आणि सौंदर्याशी करून दिली. आम्ही एकमेकांना ‘हाय’ म्हणालो आणि निघालो. दुसऱ्या दिवशी ऐश्वर्याने मला फुलांचा गुच्छ पाठवला. त्यावर संदेश होता की, ‘चांगलं काम केलं, संपर्कात राहा.’ मी तो संदेश गांभीर्याने घेतला. ऐश्वर्या माझ्यापेक्षा दोन वर्षांनी मोठी आहे. पहिल्या भेटीनंतर दोन वर्षांनी आम्ही लग्न केलं.’
Dhanush Net Worth: एकत्र कोट्यवधी रुपये कमवायचे धनुष- ऐश्वर्या
बहिणीशी मैत्री झाली, भेटणं सुरू झालं
धनुषने सांगितले होते की, ऐश्वर्याची बहीण सौंदर्या त्याची चांगली मैत्रीण झाली. त्यानंतर त्यांच्या भेटीगाठी वाढल्या आणि गोष्ट लग्नापर्यंत पोहोचली. धनुष आणि ऐश्वर्याचं लग्न रजनीकांत यांच्या घरी झालं होतं, ज्यामध्ये अनेक राजकारणी आणि बड्या व्यक्तींनी हजेरी लावली होती. संपूर्ण घर फुलांनी सजवलं होतं. एक मोठं रिसेप्शन आयोजित करण्यात आलं होतं, ज्याला कडक सुरक्षा होती.

ऐश्वर्याच्या या गुणावर भाळला होता धनुष
धनुषला जेव्हा विचारण्यात आले की ऐश्वर्या रजनीकांतची मुलगी आहे म्हणून तो तिच्याकडे आकर्षित झाला होता का? तर धनुषने उत्तर दिले, ‘मी तिच्याकडे त्या दृष्टिकोनातून कधी पाहिलं नाही. मला तिचा साधेपणा आवडतो. जर तुम्हाला तिचे वडील रजनीकांत साधे वाटत असतील तर एकदा ऐश्वर्याला भेटा. ती तिच्या वडिलांपेक्षा १०० पट साधी आहे. ती सर्वांशी समानतेने वागते आणि कोणाशीही मैत्री करू शकते. ती एक चांगली आई आहे आणि तिने आमच्या दोन्ही मुलांचं चांगलं संगोपन केलं आहे.
२००४ मध्ये लग्न, दोन मुलांचे पालक
प्रसिद्ध अभिनेता रजनीकांत यांची मुलगी ऐश्वर्या आणि धनुष यांचं २००४ मध्ये लग्न झालं. लग्नाच्या दोन वर्षांनंतर २००६ मध्ये त्यांना मोठा मुलगा यात्रा झाला. तर २०१९ मध्ये दोघांना दुसरा मुलगा लिंगा झाला. अशी दोन मुलंही आहेत. धनुष (३८) आणि ऐश्वर्या (४०) दोघांच्या वयात दोन वर्षांचा फरक आहे. यादरम्यान एक वेळ अशी आली होती, जेव्हा धनुषचं नाव ऐश्वर्याची मैत्रीण आणि अभिनेत्री श्रुती हसनशी जोडलं जाऊ लागलं. २०११ मधली ही गोष्ट आहे.
जेव्हा विवाहबाह्य संबंधांच्या बातम्या येऊ लागल्या
त्यावेळी ऐश्वर्या ‘३’ सिनेमाद्वारे दिग्दर्शनाच्या दुनियेत पाऊल ठेवत होती. या सिनेमात ऐश्वर्याने पती धनुषसोबत तिची बालपणीची मैत्रीण श्रुती हसनला साईन केलं होतं. पण सिनेमाच्या शूटिंगदरम्यान धनुष आणि श्रुतीचं अफेअर सुरू झाल्याच्या बातम्या येऊ लागल्या. या बातम्यांचा धनुष आणि ऐश्वर्याच्या लग्नावरही परिणाम झाल्याचं बोलले जात आहे. मात्र, यात किती तथ्य आहे, हे कळू शकलेलं नाही. कालांतराने धनुष आणि ऐश्वर्यामध्ये सर्व काही ठीक झालं.
‘मी दुर्दैवीच राहिलो’ नितीश भारद्वाज पत्नीपासून विभक्त
ऐश्वर्या म्हणाली होती- वडिलांनी डेट करू दिलं नाही, थेड लग्न लावलं
ऐश्वर्या आणि धनुषने त्यांचं लग्न वाचवलं. एका मुलाखतीत ऐश्वर्याने लग्नाबाबत सांगितलं होतं की, तिचे आई-वडील खूप परंपरावादी आहेत आणि त्यामुळे तिने घाईघाईत धनुषशी लग्न केलं. असं असलं तरी ती लग्नात आनंदी असल्याचंही ऐश्वर्या म्हणाली होती. ऐश्वर्याने वडील रजनीकांत यांच्यावरील पुस्तक प्रकाशनावेळी ही गोष्ट शेअर केली होती. न्यूज१८ शी झालेल्या संवादात ऐश्वर्याने सांगितले होते की, तिच्या पालकांनी तिला आणि धनुषला डेट करण्याचं स्वातंत्र्य कधीच दिलं नव्हतं. ऐश्वर्या म्हणाली, ‘त्यांनी आम्हाला लगेच लग्न करण्यास सांगितलं. आम्ही डेट केलं नाही. माझे पालक जुन्या विचारसरणीचे आहेत आणि ते का आहेत हे मला समजतं. मलाही या गोष्टीचा आदर आहे.’

धनुष बॉलिवूडमध्येही दिसला
धनुषने बॉलीवूडमध्येही नशीब आजमावले आहे. २०१३ मध्ये आलेल्या ‘रांझना’ सिनेमात तो दिसला होता, ज्यामध्ये त्याची भूमिका लोकांना आवडली होती. नुकताच त्याचा ‘अतरंगी रे’ सिनेमा प्रदर्शित झाला. या सिनेमात तो सारा अली खान आणि अक्षय कुमारसोबत दिसला होता. सिनेमातील धनुषच्या कामाचं लोकांनी कौतुक केलं.
धनुषचा पहिला सिनेमा
धनुषच्या कारकिर्दीवर नजर टाकली तर अभिनेत्याने २००२ मध्ये त्याच्या अभिनय कारकिर्दीला सुरुवात केली. यावर्षी त्याने ‘थुल्लूवधो इलामाई’ हा सिनेमा करून आपल्या अभिनयाची चुणूक दाखवली. या सिनेमातील धनुषचं काम लोकांना खूप आवडलं होतं, त्यामुळेच त्याने पहिल्या सिनेमातूनच चाहत्यांच्या मनात स्थान निर्माण केलं होतं. धनुषने आतापर्यंत ५० हून अधिक सिनेमांमध्ये काम केलं आहे.