काँग्रेस अध्यक्ष सोनिया गांधी आणि खासदार राहुल गांधी यांनी करोना व्हायरसवरून निर्माण झालेल्या परिस्थितीवर पंतप्रधान नरेंद्र मोदींना पत्र लिहिलंय. गरीबांना आणि स्थलांतर करणाऱ्या मजूर आणि कामगारांना मदत करण्याची मागणी त्यांनी केलीय. यानंतर आता प्रियांका गांधींनी गरीबांसाठी टेलिकॉम कंपन्यांना आवाहन केलंय.
करोना संकटामुळे देशात लॉकडाऊन घोषित झाला आहे. रोजंदारीवर काम करणारे मजूर आणि गरीबांकडचे पैसे संपले आहेत. टेलिकॉम कंपन्यांनी पुढील एक महिन्यासाठी इनकमिंग आणि आउटगोइंग कॉल्स निशुल्क करावेत. यामुळे गरीबांना आपल्या जीवलगांशी बोलण्यात अडचण येणार नाही, असं प्रियांका गांधी म्हणाल्या.
लॉकडाऊनमुळे हजारो लोक घराकडे निघाले आहेत. त्यांच्या मोबाइलचा बॅलेन्सही संपला आहे आणि रिचार्ज करण्यासाठी पैसेही नाहीए. यामुळे ते आपल्या कुटुंबीयांशी बोलू शकत नाही आणि त्यांचे फोनही घेऊ शकत नाहीए. महिन्याभरासाठी यामुळे मोबाइलचे इनकमिंग आणि आउटगोइंग कॉल्स निशुल्क करावेत, असं पत्र प्रियांका गांधी यांनी जिओचे प्रमुख मुकेश अंबानी, व्होडाफोन-आयडियाचे प्रमुख कुमार मंगलम बिर्ला, बीएसएनएलचे पी.के. पुर्वर आणि एअरटेलच्या भारती मित्तल यांना लिहिलंय.
Marathi News: मराठी बातम्या, Latest News in Marathi, Breaking Marathi News, Marathi News Paper | Maharashtra Times