हायलाइट्स:
- महाराष्ट्रात झपाट्याने कमी होताहेत करोना रुग्ण
- राज्यातील करोनाची तिसरी लाट संपुष्टात आली का?
- कमी चाचण्यांमुळे रुग्णसंख्या घटतेय
- ३१ जानेवारीपर्यंत राज्यातील रुग्णसंख्या कमी होणार
डॉ. भन्साली यांनी सांगितले की, राज्यातील करोना रुग्णवाढीचा वेग पाहता, त्यावरून महाराष्ट्र, विशेषतः मुंबईत १५ जानेवारीपर्यंत करोना उच्चांकी पातळीवर पोहोचला असे वाटत होते. परंतु, येत्या ३१ जानेवारीपर्यंत मुंबई आणि राज्यात करोना रुग्णांची संख्या पूर्णपणे कमी होईल असे दिसते. ‘मुंबई आणि महाराष्ट्रात करोना रुग्णसंख्या कमी होईल.’ असे ते म्हणाले.
करोना रुग्णसंख्या कमी होण्याची कारणे
- डॉ. भन्साली यांनी सांगितले की, करोना रुग्ण कमी होण्याचे प्रमुख कारण म्हणजे, राज्य सरकारने तात्काळ अतिजोखमीयुक्त देशांतून येणाऱ्या प्रवाशांवर कठोर निर्बंध लावले. तसेच गरज भासल्यास त्यांना विलगीकरणात पाठवण्यात आले.
- राज्य सरकार मुंबईसह राज्यभरात लसीकरण मोहीम अत्यंत वेगाने राबवत आहे. प्रत्येकाचे लसीकरण व्हावे, असे सरकारचे धोरण आहे.
- करोनाच्या तिसऱ्या लाटेचा धोका लक्षात घेता नागरिकांनीही कोविड नियमांचे काटेकोरपणे पालन केले.
- सद्यस्थितीत कोविड चाचण्यांचे प्रमाणही कमी झालेले आहे. यापूर्वी जवळपास दोन लाख नमुन्यांची तपासणी केली जात होती. आता हाच आकडा जवळपास दीड लाखांवर आला आहे.
- सौम्य लक्षणे असलेले रुग्ण घरीच उपचार घेऊन बरे होत आहेत.
मुंबईतील करोना रुग्णसंख्येचा घसरता आलेख
१० जानेवारी – १३६४८
११ जानेवारी – ११६४७
१२ जानेवारी – १६४२०
१३ जानेवारी – १३७०२
१४ जानेवारी – ११३१७
१५ जानेवारी – १०६६१
१६ जानेवारी – ७८९५
१७ जानेवारी – ५९५६