हायलाइट्स:

  • धनुष आणि ऐश्वर्या यांनी विभक्त होत असल्याची केली घोषणा
  • १८ वर्षांचा संसार आलं संपुष्टात
  • दोघांच्या घटस्फोटाची बातमी ऐकून चाहत्यांना बसलाय धक्का

मुंबई- सुपरस्टार अभिनेता धनुष आणि त्याची बायको ऐश्वर्या यांनी ते वेगळे होत असून भविष्यात एकमेकांचे चांगले मित्र राहतील अशी घोषणा केली. लग्नाच्या १८ वर्षांनंतर दोघांनी विभक्त होण्याचा निर्णय घेतला. दोघांच्या घटस्फोटाची बातमी समोर आल्यानंतर चाहत्यांना मोठा धक्का बसला होता. अवघ्या काही मिनिटांमध्ये सोशल मीडियावर धनुष ट्रेण्ड करू लागला होता.

१८ वर्षांनंतर धनुष- ऐश्वर्या झाले वेगळे, चाहते काय म्हणाले…

अभिनेता धनुषच्या चाहत्यांनी आपल्या लाडक्या अभिनेत्याने घेतलेल्या निर्णयाला पाठिंबा दर्शवला आहे. धनुषच्या काही चाहत्यांनी त्याचे आणि ऐश्वर्याचे भावुक करणारे फोटो, व्हिडिओ सोशल मीडियावर शेअर केले आहेत. यातील एक व्हिडिओ सोशल मीडियावर सर्वांचेच लक्ष वेधून घेत आहे. या व्हिडिओमध्ये धनुष त्याच्या बायकोसाठी ऐश्वर्यासाठी गाणं गाताना दिसत आहे.

धनुष- ऐश्वर्या

ऐश्वर्याचे वडील आणि सुपरस्टार रजनीकांत यांच्या ‘पेट्टा’ सिनेमातील गाणे धनुष गाताना दिसत आहे. या व्हिडिओमध्ये धनुष ‘इल्लमाई थिरुमबुथी’ हे रोमँटिक गाणे गाताना दिसत आहे. धनुषचे बायकोवर असलेले प्रेम पाहून सर्वजण भावुक झाले आहेत. धनुष आपल्यासाठी रोमँटिक गाणं गाताना पाहून ऐश्वर्या लाजते आणि आपला चेहरा हाताने झाकून घेते.

धनुष- ऐश्वर्याच्या पहिल्या भेटीपासून ते घाईत केलेल्या लग्नापर्यंत, जाणून घ्या सर्वकाही

दरम्यान, धनुषच्या कामाबद्दल सांगायचं तर लवकरच त्याचा ‘मारन’ हा सिनेमा प्रदर्शित होणार आहे. सध्या तो ‘वाथी’ या सिनेमाच्या चित्रीकरणात व्यग्र आहे. या सिनेमाचं दिग्दर्शन व्यंकी अथुलारी यांनी केले आहे. बॉलिवूडमधील सिनेमांतही धनुष काम करताना दिसत आहे. काही दिवसांपूर्वीच अक्षय कुमार आणि सारा अली खान यांच्यासोबतचा ‘अतरंगी रे’ सिनेमात दिसला होता. या सिनेमाला प्रेक्षकांकडून संमिश्र प्रतिसाद मिळाला. धनुषने ‘रांझणा’ सिनेमातही काम केले होते. त्याला ही प्रेक्षकांनी चांगला प्रतिसाद मिळाला होता.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here