हायलाइट्स:

  • सौदी अरेबिया आणि संयुक्त अरब अमिरातकडून दहशतवादी हल्ल्याला प्रत्यूत्तर
  • सनाच्या उत्तरेकडेस अरब सैन्याच्या लढावू विमानांनी हवाई हल्ला
  • हुथी कमांडर मेजर जनरल अब्दुल्ला कासिम अल जुनैद मारला गेला

दुबई, संयुक्त अरब अमिरात :

सोमवारी अबुधाबीत करण्यात आलेल्या ड्रोन हल्ल्याला सौदी अरेबिया आणि संयुक्त अरब अमिरातनं सोमवारी रात्री प्रत्यूत्तर दिलंय. प्रत्यूत्तरादाखल हुती बंडखोरांवर केलेल्या हवाई हल्ल्यात सोमवारी रात्री हुतींच्या टॉप कमांडरचा खात्मा करण्यात आल्याचं समजतंय. येमेनची राजधानी सनाच्या उत्तरेकडील भागात अरब सैन्याच्या लढावू विमानांनी हवाई हल्ला केला. या हल्ल्यात हुती कमांडर मेजर जनरल अब्दुल्ला कासिम अल जुनैद याला ठार करण्यात आलंय.

सोमवारी, यूएई राजधानी अबुधाबीमध्ये एका ड्रोनसदृश वस्तूनं धडक दिल्यानं लागलेल्या आगीमुळे तीन टँकरचा सोमवारी स्फोट झाला. या दुर्घटनेत दोन भारतीय व एका पाकिस्तानी नागरिकाचा मृत्यू झाला, तर सहा जण जखमी झाले होते. तर हल्ल्यानंतर तत्काळ येमेनच्या हुती बंडखोरांनी अधिक तपशील न देता आपणच ‘यूएई’ला लक्ष्य केल्याचा दावा केला होता. यानंतर सौदी आणि यूएईकडून येमेनच्या राजधानीवर हल्ला करण्यात आलाय.

Houthi Rebels: कोण आहेत ‘हुती बंडखोर’? यूएई-सौदीवर का होत आहेत हल्ले?
अबुधाबी ड्रोन हल्ला : दोन भारतीयांसहीत तिघांचा मृत्यू, सहा जखमी
सोमवारी, सरकारी मालकीच्या अबुधाबी राष्ट्रीय तेल कंपनीच्या (एडीएनओसी) मुसाफह आयसीएडी-३ या भागात लागलेल्या आगीमुळे टँकरचा स्फोट झाला होता. ड्रोनसदृश लहान वस्तूमुळेच तेल कंपनी आणि विमानतळानजिक या आगी लागल्याचं प्राथमिक तपासातून समोर आलं. विशेष म्हणजे, दक्षिण कोरियाचे अध्यक्ष मून जे-इन ‘यूएई’च्या दौऱ्यावर असताना या घटना घडल्या.

अबुधाबी आंतरराष्ट्रीय विमानतळाच्या विस्तारीकरण सुरू असलेल्या भागात झालेल्या स्फोटांना यूएईच्या परराष्ट्र मंत्र्यांनी ‘दहशतवादी घटना’ म्हटलं होतं तसंच या स्फोटासाठी जबाबदार असणाऱ्यांना धडा शिकवण्याचं वक्तव्यही त्यांनी केलं होतं.

India China: ​चीनकडून पँगाँग सरोवरावर पूल; बर्फवृष्टीतही ४०० मीटरचं काम पूर्ण​

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here