हायलाइट्स:
- कामांची बिले मंजूर करण्यासाठी १ लाख १५ हजार रूपयांच्या लाचेची मागणी
- वन परिक्षेत्रीय अधिकाऱ्याला आज मंगळवारी अटक
- रावेर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल
तक्रारदार औरंगाबाद जिल्ह्यातील रहिवाशी असून ते शासकीय कंत्राटदार आहेत. त्यांनी जळगाव जिल्ह्यातील वनविभागकडून रावेर तालुक्यात ए. एन. आर. रोपवन अंतर्गत चेनसिंग फेनसिंग व गेटचे काम ऑनलाईन ई टेन्डरींगच्या पद्धतीने घेतलं होतं. यापैकी त्यांनी तीन काम पूर्णही केली होती. यातील दोन कामांचा त्यांना अद्याप धनादेश मिळालेला नव्हता.
धनादेशाच्या मोबदल्यात वन परिक्षेत्रीय अधिकारी मुकेश हरी महाजन यांनी ५ टक्के कमिशनप्रमाणे १ लाख ३० हजार रूपयांची मागणी केली. तडजोडी अंती १ लाख १५ हजार रूपयांची मागणी त्यांनी केली होती.
दरम्यान, आज सकाळी लाचेची मागणी केली म्हणून वन परिक्षेत्रीय अधिकारी मुकेश हरी महाजन यांना अटक करण्यात आली आणि त्यांच्यावर रावेर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला.