शिवसेनेचे महान नेते संजय राऊत सातत्याने गोवा विधानसभा निवडणुकीबाबत विधानं करत आहेत. पण याच शिवसेनेला २०१७ च्या निवडणुकीत संपूर्ण गोव्यातून ७९२ मतं मिळाली होती. त्यांनी लढवलेल्या तिन्ही जागांवरील उमेदवारांचे डिपॉझिट जप्त झाले.

चंद्रकांत पाटील यांनी शिवसेना आणि राष्ट्रवादीची गोवा व उत्तरप्रदेश निवडणुकीतील २०१७ च्या निवडणुकीतील मतांची आकडेवारी जाहीर करुन दोन्ही पक्षांची अक्षरश: खिल्ली उडवली.
हायलाइट्स:
- उत्तर प्रदेशात २०१७ साली शिवसेनेने ५७ जागा लढवल्या होत्या
- या निवडणुकीत शिवसेनेला ११ कोटी मतदारांपैकी ८८५९५ जणांनी मतदान केले
- तर ५७ पैकी ५६ जागांवरील शिवसेना उमेदवारांचे डिपॉझिटही जप्त झाले होते
तर उत्तर प्रदेशात २०१७ साली शिवसेनेने ५७ जागा लढवल्या होत्या. या निवडणुकीत शिवसेनेला ११ कोटी मतदारांपैकी ८८५९५ जणांनी मतदान केले. त्यांच्या मतदानाची टक्केवारी अवघी ०.७१ टक्के इतकी होती. याचा अर्थ प्रत्येक जागेवर शिवसेनेला सरासरी १५५४ मतं पडली होती. एवढंच नव्हे तर ५७ पैकी ५६ जागांवरील शिवसेना उमेदवारांचे डिपॉझिटही जप्त झाले होते. हीच शिवसेना आता उत्तर प्रदेशात राकेश टिकैत आणि अखिलेश यादव यांच्यासोबत लढण्याची भाषा करत आहे, असेही चंद्रकांत पाटील यांनी म्हटले.
चंद्रकांत पाटलांकडून राष्ट्रवादीचीही ‘झाडाझडती’
चंद्रकांत पाटील यांनी या पत्रकारपरिषदेत राष्ट्रवादी काँग्रेसने २०१७ च्या निवडणुकीत केलेल्या कामगिरीचा तपशीलही सादर केला. २०१७ मध्ये राष्ट्रवादीने उत्तर प्रदेशात ३० जागा लढवल्या. या जागांवर त्यांना एकूण ३३४९४ मिळाली आणि सर्व उमेदवारांचे डिपॉझिट जप्त झाले. तर गोव्यात राष्ट्रवादी काँग्रेसने १७ जागा लढवल्या होत्या. याठिकाणी त्यांना अवघी २०९१६ मतं मिळाली. तर १७ पैकी १६ उमेदवारांचं डिपॉझिट जप्त झालं. ही सगळी परिस्थिती असताना शिवसेना आणि राष्ट्रवादीचे नेते गोव्यात सत्तास्थापनेच्या कसल्या गमजा मारतायत, असा खोचक सवालही चंद्रकांत पाटील यांनी उपस्थित केला.
जवळच्या शहरातील बातम्या
मराठी बातम्या अॅप: तुम्हालाही तुमच्या अवतीभवती होत असलेल्या बदलांमध्ये सहभागी व्हायचं आहे? सिटिझन रिपोर्टर अॅप डाउनलोड करा आणि रिपोर्ट्स पाठवा.
या बातम्यांबद्दल अधिक वाचा
मराठी बातम्या महाराष्ट्र टाइम्स, टीआयएल नेटवर्क कडून