Nagar Panchayat Election Results Live updates: नाशिक, जळगावसह उत्तर महाराष्ट्रातील काही जिल्ह्यांत झालेल्या नगरपंचायत निवडणुकीचा निकाल आज जाहीर होत आहे. महाविकास आघाडीतील बिघाडामुळं अनेक ठिकाणच्या निकालाबाबत उत्सुकता आहे.

बोदवड नगरपंचायत कार्यालय
- अकोले नगर पंचायतीत माजी मंत्री मधुकर पिचड आणि राष्ट्रवादीचे आमदार डॉ. किरण लहामटे यांच्यात सामना
- पारनेरमध्ये आमदार नीलेश लंके आणि विजय औटी यांच्यात वर्चस्वाची लढाई
- नगर जिल्ह्यात कर्जत, पारनेर व अकोले नगरपंचायतीचा निकाल; आमदार रोहित पवार व माजी मंत्री राम शिंदे यांची कसोटी
- करोनाच्या पार्श्वभूमीवर गर्दी होऊ नये म्हणून मतमोजणी केंद्रावर कडेकोट पोलीस बंदोबस्त
- बोदवडमध्ये राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते एकनाथ खडसे, भाजपचे नेते गिरीश महाजन, राज्यमंत्री गुलाबराव पाटील यांची प्रतिष्ठा पणाला
- शिवसेना व राष्ट्रवादी काँग्रेसमधील मतभेदांमुळं बोदवडच्या निकालाबाबत प्रचंड उत्सुकता
- जळगाव जिल्ह्यातील बोदवड नगरपंचायतीचीही आज मतमोजणी
- नाशिक जिल्ह्यातील कळवण, देवळा, निफाड आणि दिंडोरी नगरपंचायतींच्या निकालाकडं लक्ष
- उत्तर महाराष्ट्रातील नगरपंचायत निवडणुकीची आज मतमोजणी
जवळच्या शहरातील बातम्या
मराठी बातम्या अॅप: तुम्हालाही तुमच्या अवतीभवती होत असलेल्या बदलांमध्ये सहभागी व्हायचं आहे? सिटिझन रिपोर्टर अॅप डाउनलोड करा आणि रिपोर्ट्स पाठवा.
या बातम्यांबद्दल अधिक वाचा
वेब शीर्षक: ahmednagar, nashik, jalgaon nagar panchayat election results live updates
मराठी बातम्या महाराष्ट्र टाइम्स, टीआयएल नेटवर्क कडून
मराठी बातम्या महाराष्ट्र टाइम्स, टीआयएल नेटवर्क कडून