फ्रँकफर्ट, जर्मनीः करोनाने जगभरात थैमान घातले आहे. याचा विपरित परिणाम जगाच्या अर्थव्यवस्थेवर होत आहे. तसंच अनेक देशांच्या अर्थव्यवस्थांना फटका बसत आहे. जर्मनीत अर्थव्यवस्थेच्या चिंतेतून हेस्सी राज्याचे अर्थमंत्री थॉमस शेफर यांनी आत्महत्या केल्याचं सांगण्यात येतंय. करोनामुळे होत असलेले मृत्यू आणि अर्थव्यवस्थेचे नुकसान ला यासर्व परिस्थिला तोंड कसे द्यावे या तणावात होते. यामुळे त्यांनी आत्महत्या केली असावी, अशी माहिती राज्याचे प्रीमियर व्होकर बेफियर यांनी दिली.

थॉमस शेफर यांचा मृतदेह रेल्वे रूळाजवळ आढळून आला. त्यांनी रेल्वेसमोर उडी घेऊन आत्महत्या केल्याचं बोललं जातंय. शेफर यांच्या मृत्यूने आम्हाला मोठा धक्का बसला आहे. विश्वास बसत नाहीए. या घटेनेने आम्ही खूप दुखी आहोत, असं हेस्सी राज्याचे प्रीमियर व्होकर म्हणाले. शेफर गेल्या १० वर्षांपासून हेस्सीचे अर्थमंत्री होते.

फ्रँकफर्ट हे जर्मनील मोठ्या बँकांचे वित्तीय केंद्र आहे. तिथे अनेक बँकांची मुख्यालयं आहेत. युरोपीय सेंट्रल बँकही फ्रँकफर्टमध्ये आहे. करोना व्हायरसमुळे अर्थव्यवस्थेचे नुकसान होत असल्याने ते रोखण्यासाठी शेफर हे दिवसरात्र काम करत होते. तसंच कंपन्या आणि कामगारांची ते मदत करत होते, असं व्होकर म्हणाले.

शेफर अतिशय दुखी होते. आमच्यासाठी हा अतिशय कठीण काळ आहे. आम्हाला त्यांची खूप गरज होती, असं व्होकर यांनी सांगितलं. शेफर हे हेस्सी राज्याचे पुढचे प्रीमियर असतील, असं मानलं जात होतं. शेफर यांच्या पश्चात त्यांची दोन मुले आणि पत्नी आहेत.

Marathi News: मराठी बातम्या, Latest News in Marathi, Breaking Marathi News, Marathi News Paper | Maharashtra Times

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here