Western Maharashtra Nagar Panchayat Election Results Live Updates: पश्चिम महाराष्ट्रातील अनेक महत्त्वाच्या नगरपंचायत निवडणुकीच्या मतमोजणीला सुरुवात झाली असून काही तासांताच येथील निकालाचं चित्र स्पष्ट होणार आहे.

नगरपंचायत निवडणूक मतमोजणी
- सोलापूर: माळशिरसमध्ये राष्ट्रवादी काँग्रेसला धक्का; भाजपला ७, अपक्षांना तीन जागा. राष्ट्रवादी काँग्रेस अद्यापही शून्यावर
- सोलापूर: माढामध्ये काँग्रेसला स्पष्ट बहुमत. आतापर्यंत जाहीर १५ जागांपैकी काँग्रेस १० जागांवर विजयी. राष्ट्रवादीला दोन, शिवसेनेला दोन जागा. एका जागेवर अपक्षाची बाजी
- रोहित पाटील यांची जादू चालणार का? सांगलीतील कवठेमहांकाळ येथे राष्ट्रवादी विरुद्ध सर्वपक्षीय लढत.
- सोलापुरातील नातेपुते, माळशिरस, श्रीपूर महाळूनग इथंही मतमोजणीला सुरुवात
- माढाच्या माजी नगराध्यक्ष मीनल साठे व त्यांचे पुतणे शाहू साठे यांच्यातील लढतीच्या निकालाकडं लक्ष
- माढा नगरपंचायतीची निवडणूक लढलेल्या ४५ उमेदवारांच्या भवितव्याचा आज फैसला
- माढा, कवठेमहंकाळ इथं मतमोजणीला सुरुवात
- पश्चिम महाराष्ट्रातील अनेक महत्त्वाच्या नगरपंचायत निवडणुकीचे आज निकाल
जवळच्या शहरातील बातम्या
मराठी बातम्या अॅप: तुम्हालाही तुमच्या अवतीभवती होत असलेल्या बदलांमध्ये सहभागी व्हायचं आहे? सिटिझन रिपोर्टर अॅप डाउनलोड करा आणि रिपोर्ट्स पाठवा.
या बातम्यांबद्दल अधिक वाचा
वेब शीर्षक: पश्चिम महाराष्ट्र नगर पंचायत निवडणुकीचे निकाल थेट अपडेट
मराठी बातम्या महाराष्ट्र टाइम्स, टीआयएल नेटवर्क कडून
मराठी बातम्या महाराष्ट्र टाइम्स, टीआयएल नेटवर्क कडून