हायलाइट्स:

  • जागतिक आरोग्य संघटनेच्या भारतातील प्रमुखांचं मत
  • सरसकट बंदी घालण्यासारख्या नियमांचं WHO कडून समर्थन नाही
  • ‘असुरक्षित आणि अद्याप लसीकरण न झालेल्या नागरिकांना लस मिळावी’

वृत्तसंस्था, नवी दिल्ली :

करोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी भारतासारख्या देशामध्ये प्रवास आणि नागरिकांच्या घराबाहेर पडण्यावर सरसकट निर्बंध लादण्याऐवजी थोडी जोखीम पत्करावी,’ अशी सूचना जागतिक आरोग्य संघटनेचे (डब्ल्यूएचओ) भारतातील प्रमुख rodrico offrin यांनी केली आहे. ((रॉडेरिको एच ऑफ्रिन, WHO भारताचे प्रमुख)

देशामध्ये सध्या करोनाची तिसरी लाट असून, रोज मोठ्या संख्येने नव्या रुग्णांची नोंद होत आहे. करोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी केंद्र आणि राज्यांच्या सरकारांकडून विविध निर्बंध लादण्यात येत आहेत. या पार्श्वभूमीवर ‘नागरिकांचा जीव आणि त्यांची रोजीरोटी वाचवण्याची गरज आहे,’ यावर भर देऊन ऑफ्रिन म्हणाले, ‘करोनाच्या व्हेरिएंटपासून संसर्गाचा किती प्रसार होतो, या आजाराची लक्षणे किती तीव्र आहेत, लसीकरणामुळे संसर्गापासून किती संरक्षण होते आणि सामान्य नागरिक किती धोका सहन करू शकतात, या चार प्रमुख प्रश्नांचा विचार करून भारत आणि जगभरामध्ये सार्वजनिक नियमांची आखणी व्हायला हवी. प्रवास किंवा नागरिकांच्या घराबाहेर पडण्यावर सरसकट बंदी घालण्यासारख्या नियमांचे जागतिक आरोग्य संघटना कधीच समर्थन करत नाही. अशा नियमांमुळे अपेक्षित उपाययोजना करण्यामध्ये अडचणीच येतात. भारतासारख्या मोठ्या आणि वैविध्य असणाऱ्या देशामध्ये धोक्याच्या शक्यतांचा विचार करूनच धोरण आखण्याची गरज आहे.’

Omicron Variant: ‘ओमिक्रॉन’ सामान्य नाही! रुग्णसंख्येसहीत मृत्यूंच्या संख्येतही लक्षणीय वाढCovid19: करोनापासून बचावासाठी कोणता मास्क सर्वोत्तम? तज्ज्ञांचा नागरिकांना सल्ला…
‘सर्वांना लस मिळावी’

करोना प्रतिबंधक लशीच्या बूस्टर डोसविषयी सातत्याने चर्चा होत आहे, त्याविषयी ऑफ्रिन म्हणाले, ‘समाजातील सर्वांत असुरक्षित असणाऱ्या आणि अद्याप लसीकरण न झालेल्या नागरिकांना लस मिळावी, ही जागतिक आरोग्य संघटनेची मुख्य शिफारस आहे. याच धोरणावर भारताच्या लसीकरणाचा कार्यक्रमही सुरू आहे. याशिवाय, ज्यांना दुर्धर आजार आहेत आणि वयस्कर व्यक्तींना बूस्टर डोस देता येऊ शकतो. सरसकट सर्वांना बूस्टर डोस दिल्यास समाजातील मोठा वर्ग लसीकरणापासून दूर राहू शकतो आणि हा आजार दीर्घ काळ राहू शकतो.’

करोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी कोणत्या गोष्टी करायच्या आणि कोणत्या टाळायच्या, याविषयी नियमावली आहे. त्या नियमांचे पालन केल्यास लॉकडाउनची गरज नाही.

Teenage Pregnancies: करोना काळात हजारो अल्पवयीन मुलींना ‘गर्भधारणे’मुळे सोडावी लागली शाळा!
Covid19: अमेरिकेतील रुग्णालये भरली, चाचण्यांचं प्रमाण दुप्पट करणार

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here