हायलाइट्स:

  • मुंबईत गे सेक्स रॅकेटचा पर्दाफाश
  • मालवणी पोलिसांनी तिघांना केली अटक
  • डेटिंग अॅपच्या माध्यमातून चालवायचे रॅकेट
  • हायप्रोफाइल ग्राहकही सामील असल्याची माहिती

मुंबई : मुंबईत गे सेक्स रॅकेटचा पर्दाफाश करण्यात आला आहे. शहरातील मालवणी पोलिसांनी या प्रकरणी तीन आरोपींना अटक केली आहे. मीडिया रिपोर्ट्सनुसार, हे रॅकेट ऑनलाइन डेटिंग गे अॅपच्या माध्यमातून सेक्स रॅकेट चालवत होते. लोकांना ब्लॅकमेल केले जात होते. मालवणी पोलिसांनी सांगितले की, या प्रकरणी तीन जणांना अटक केली आहे. दरम्यान, या कारवाईनंतर पोलिसांनी केलेल्या प्राथमिक चौकशीत धक्कादायक माहिती हाती लागली आहे.

या प्रकरणी माहिती देताना मालवणीचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक हसन मुलानी यांनी सांगितले की, आम्हाला एका व्यक्तीने तक्रार दिली होती. पाच जणांनी धमकावून रोकड आणि एटीएम कार्ड हिसकावून घेतले. आरोपींनी त्या पीडित व्यक्तीचे आक्षेपार्ह व्हिडिओ सोशल मीडियावर शेअर केले होते, असे त्याने तक्रारीत म्हटले होते.

बारामतीत केसरी टूर्स कार्यालयातील महिलेवर चाकू हल्ला; भल्या सकाळी धक्कादायक घटना
रायगड जिल्हा हादरला! पेणमध्ये एटीएम सेंटरवर दरोडा; ५६ लाख रूपये पळवले

सेक्स रॅकेटमध्ये हायप्रोफाइल ग्राहक सामील

पोलीस तपासात धक्कादायक माहिती उघड झाली आहे. यात हायप्रोफाइल ग्राहकही आहेत. पोलिसांनी आरोपींना अटक केल्यानंतर या हायप्रोफाइल ग्राहकांवरही कारवाई केली जाण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.

Mumbai News : आयआयटी मुंबईच्या विद्यार्थ्याने हॉस्टेलच्या सातव्या मजल्यावरून उडी मारून केली आत्महत्या

काय आहे संपूर्ण प्रकरण

मिळालेल्या माहितीनुसार, आरोपींनी गे डेटिंग अॅपच्या माध्यमातून एका कंपनीच्या अकाउंटंटला जाळ्यात अडकवले होते. त्याच्याकडे प्रतितास एक हजार रुपयांची मागणी केली. सगळे काही ठरल्यानंतर पीडित त्यांनी सांगितलेल्या पत्त्यावर पोहोचला. तिथे पोहोचल्यानंतर आधीच उपस्थित असलेल्या पाच जणांनी त्याला मारहाण केली. त्याचा फोन, पाकीट आणि एटीएम हिसकावून घेतले. आरोपींनी त्याला धमकी देत पिन कोडची माहिती घेतली. त्यानंतर पीडित व्यक्तीचा व्हिडिओ तयार करण्यात आला. त्यानंतर तो सोशल मीडियावर व्हायल करण्याची धमकी देण्यात आली.

खळबळ! दुचाकीवरून दोघे गावठी बॉम्ब घेऊन रत्नागिरीत येत होते, ATS पथकाला संशय आल्यानंतर…

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here