हायलाइट्स:

  • ‘अमेरिकेच्या मदतीशिवाय अफगाणिस्तानचे हवाई दल तग धरू शकणार नाही’
  • अफगाणी हवाई दल कोसळण्याचा आधीच इशारा
  • एसआयजीएआर जॉन सोपको यांनी संरक्षण मंत्रालयाला सोपवलेला अहवाल उघड

वृत्तसंस्था, काबूल :

अमेरिकेकडून मदत, प्रशिक्षण आणि देखभाल न केली गेल्यास अफगाणिस्तानचे हवाई दल कोसळून पडेल, असा गंभीर इशारा अमेरिकेचे अध्यक्ष जो बिडेन यांनी गेल्या वर्षी अफगाणिस्तानातून संपूर्ण माघार घेण्याचा निर्णय जाहीर करण्याच्या कित्येक महिने आधीच अमेरिकेतील एका महत्त्वपूर्ण अहवालात देण्यात आला होता. हा गोपनीय अहवाल मंगळवारी उघड करण्यात आला.

अफगाणिस्तान फेरउभारणी विभागाचे विशेष महानिरीक्षक (एसआयजीएआर) जॉन सोप्को यांचा हा अहवाल संरक्षण मंत्रालयाला जानेवारी २०२१मध्ये सादर करण्यात आला. अमेरिकेच्या मदतीशिवाय अफगाणिस्तानचे हवाई दल तग धरू शकणार नाही, असा इशारा अमेरिकी यंत्रणांना याआधीच देण्यात आला होता, असे या अहवालात अधोरेखित करण्यात आले आहे.

सांगता काय! मद्याच्या एका बाटलीसाठी मोजले चार कोटी रुपये
Houthi Rebels: अबुधाबी ड्रोन हल्ल्याला प्रत्यूत्तर; ‘हुती बंडखोरांच्या’ टॉप कमांडरचा खात्मा
विशेषत: हवाई दलाला साह्य करणाऱ्या अफगाणी कर्मचाऱ्यांना प्रशिक्षण देण्यात अमेरिका अयशस्वी ठरली आहे. त्यामुळे अमेरिकेच्या कंत्राटदारांच्या अनुपस्थितीत अफगाणिस्तानचे हवाई दल आपल्या विमानांची देखभाल करू शकणार नाही, असे या अहवालात स्पष्ट करण्यात आले होते.

अफगाणिस्तानातील २० वर्षांच्या तालिबानविरोधी युद्धात सरकारी यंत्रणांना अमेरिकेच्या हवाई दलाचे पाठबळ हा महत्त्वाचा घटक होता. हे पाठबळ दूर झाल्यानंतर ही पोकळी भरून काढण्याची क्षमता अफगाणी हवाई दलात नसल्याने अमेरिकेच्या माघारीनंतर लगेचच तालिबान्यांनी देशातील सत्ता ताब्यात घेतली.

Madhesh Pradesh: ‘मधेश प्रदेश’… भारताच्या सीमेनजिक नेपाळच्या प्रांताला मिळालं नवीन नाव!
सरसकट लॉकडाउन नको, जागतिक आरोग्य संघटनेची भारताला सूचना

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here