देवगड नगरपंचायतीमध्ये शिवसेनेचा एक नगरसेवक होत्या. त्याठिकाणीही शिवसेना आणि राष्ट्रवादीचे मिळून ९ उमेदवार विजयी झाले आहेत. त्यामुळे देवगड नगरपंचायतीवर आमची सत्ता येईल. तर कुडाळ नगरपंचायतीमध्ये यापूर्वी शिवसेनेचे ५ नगरसेवक होते.

विनायक राऊत नारायण राणे

वैभववाडी नगर पंचायतीमध्ये शिवसेनेचा एकही नगरसेवक नव्हता. त्याठिकाणी यंदा शिवसेनेचे ५ तर शिवसेना पुरस्कृत दोन उमेदवारांचा विजय झाला आहे.

हायलाइट्स:

  • कोकणातील आणखी एक प्रतिष्ठेची लढत असलेल्या दापोली नगरपंचायतीमध्येही शिवसेनेची सरशी होताना दिसत आहे
  • सिंधुदुर्गात शिवसेनेची ताकद वाढली आहे, असा दावाही विनायक राऊत यांनी केला

मुंबई : सिंधुदुर्गात शिवसेनेने नारायण राणे यांच्या वर्चस्वाला धक्का दिल्याचा दावा शिवसेना खासदार विनायक राऊत यांनी केला. वैभववाडी नगर पंचायतीमध्ये शिवसेनेचा एकही नगरसेवक नव्हता. त्याठिकाणी यंदा शिवसेनेचे ५ तर शिवसेना पुरस्कृत दोन उमेदवारांचा विजय झाला आहे. देवगड नगरपंचायतीमध्ये शिवसेनेचा एक नगरसेवक होत्या. त्याठिकाणीही शिवसेना आणि राष्ट्रवादीचे मिळून ९ उमेदवार विजयी झाले आहेत. त्यामुळे देवगड नगरपंचायतीवर आमची सत्ता येईल. तर कुडाळ नगरपंचायतीमध्ये यापूर्वी शिवसेनेचे ५ नगरसेवक होते. आता आमचे ७ नगरसेवक निवडून आले आहेत. याठिकाणी काँग्रेसने सहकार्य केल्यास आमची सत्ता येईल, असा दावा विनायक राऊत यांनी केला. ही एकूण परिस्थिती पाहता सिंधुदुर्गात शिवसेनेची ताकद वाढली आहे, असा दावाही विनायक राऊत यांनी केला.

तर दुसरीकडे कोकणातील आणखी एक प्रतिष्ठेची लढत असलेल्या दापोली नगरपंचायतीमध्येही शिवसेनेची सरशी होताना दिसत आहे. याठिकाणी आतापर्यंत ११ जागांचे निकाल हाती आले आहेत. यापैकी ९ जागांवर शिवसेना तर २ जागांवर राष्ट्रवादी काँग्रेसचे उमेदवार विजयी झाले आहेत. त्यामुळे दापोलीतल रामदास कदम विरुद्ध अनिल परब या वादात शिवसेनेची स्पष्टपणे सरशी होताना दिसत आहे. राज्यातील १०५ नगरपंचायतींचे निकाल आज जाहीर होत आहेत. आतापर्यंत यापैकी सर्वाधिक १२ नगरपंचायती शिवसेनेच्या ताब्यात गेल्या आहेत. तर भाजप ११ नगरपंचायतींसह दुसऱ्या स्थानावर आहे.
Nagarpanchyat Election results LIVE: दापोलीत रामदास कदमांना धक्का, अनिल परबांची सरशी; नगरपंचायतीवर शिवसेना-राष्ट्रवादीची सत्ता
दापोली नगरपंचायतमध्ये शिवसेना-राष्ट्रवादीला स्पष्ट बहुमत

दापोली नगरपंचायत निवडणूकीत पालकमंत्री अनिल परब यांनी जाहीर केलेल्या शिवसेना राष्ट्रवादी आघाडीची सत्तेला मोठा विजय मिळाला आहे. रामदास कदम यांना मोठा धक्का बसला आहे. शिवसेना-६, राष्ट्रवादी-८, अपक्ष -२ भाजप आणि फक्त एका जागेवर भाजपच्या उमेदवाराचा विजय झाला आहे.

जवळच्या शहरातील बातम्या

मराठी बातम्या अॅप: तुम्हालाही तुमच्या अवतीभवती होत असलेल्या बदलांमध्ये सहभागी व्हायचं आहे? सिटिझन रिपोर्टर अॅप डाउनलोड करा आणि रिपोर्ट्स पाठवा.

वेब शीर्षक: सिंधुदुर्गमध्ये नगर पंचायत निवडणुकीच्या निकालात भाजप नारायण राणेंच्या विरोधात शिवसेनेला जास्त जागा: विनायक राऊत
मराठी बातम्या महाराष्ट्र टाइम्स, टीआयएल नेटवर्क कडून

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here