हायलाइट्स:
- या निवडणुकीत शिवसेनेविरोधात बंडाचे निशाण फडकवणारे रामदास कदम आणि मातोश्रीच्या निकटचे समजले जाणारे अनिल परब यांची प्रतिष्ठा पणाला लागली होती
- अनिल परब यांची स्पष्टपणे सरशी झाल्याचे चित्र दिसत आहे
आज सकाळी मतमोजणीला सुरुवात झाल्यापासूनच शिवसेना आणि राष्ट्रवादीने आघाडी घेतली होती. दोन्ही पक्षांनी ही आघाडी शेवटपर्यंत टिकवून ठेवत भाजप किंवा रामदास कदम समर्थकांना एकदाही डोके वर काढण्याची संधी दिली नाही. त्यामुळे दापोली नगरपंचायतीमध्ये आता शिवसेना आणि राष्ट्रवादीची सत्ता असेल.
सिंधुदुर्गात शिवसेना-भाजपमध्ये काँटे की टक्कर
सिंधुदुर्ग जिल्हा बँकेच्या निवडणुकीनंतर कोकणात नगरपंचायत निवडणुकांच्यानिमित्ताने पुन्हा एकदा महाविकासआघाडी विरुद्ध राणे कुटुंबीय असा सामना रंगला होता. सिंधुदुर्ग जिल्ह्यातील कुडाळ, देवगड-जामसांडे, वाभवे-वैभववाडी व कसई-दोडामार्ग नगरपंचायत निवडणुकांचा निकाल आज जाहीर झाला. यामध्ये सर्व ठिकाणी शिवसेना आणि भाजपमध्ये काँटे की टक्कर पाहायला मिळत आहे. मात्र, सिंधुदुर्गात शिवसेनेने नारायण राणे यांच्या वर्चस्वाला धक्का लावल्याचा दावा शिवसेना खासदार विनायक राऊत यांनी केला आहे. वैभववाडी नगर पंचायतीमध्ये शिवसेनेचा एकही नगरसेवक नव्हता.
त्याठिकाणी यंदा शिवसेनेचे ५ तर शिवसेना पुरस्कृत दोन उमेदवारांचा विजय झाला आहे. देवगड नगरपंचायतीमध्ये शिवसेनेचा एक नगरसेवक होत्या. त्याठिकाणीही शिवसेना आणि राष्ट्रवादीचे मिळून ९ उमेदवार विजयी झाले आहेत. त्यामुळे देवगड नगरपंचायतीवर आमची सत्ता येईल. तर कुडाळ नगरपंचायतीमध्ये यापूर्वी शिवसेनेचे ५ नगरसेवक होते. आता आमचे ७ नगरसेवक निवडून आले आहेत. याठिकाणी काँग्रेसने सहकार्य केल्यास आमची सत्ता येईल, असा दावा विनायक राऊत यांनी केला. ही एकूण परिस्थिती पाहता सिंधुदुर्गात शिवसेनेची ताकद वाढली आहे, असे विनायक राऊत यांनी म्हटले.
Ratnagiri News | रत्नागिरी बातमी | Ratnagiri News in Marathi | Ratnagiri Local News – Maharashtra Times