सातारा : सातारा जिल्ह्यातील सर्व सहा नगरपंचायतींचे निकाल हाती आले असून जिल्ह्यात पुन्हा एकदा राष्ट्रवादीचं वर्चस्व दिसून आलं आहे. सहापैकी चार नगरपंचायतींवर राष्ट्रवादीने आपला झेंडा फडकावला आहे. मात्र जिल्ह्यातील राष्ट्रवादीचे दिग्गज नेते आणि विधानपरिषदेचे आमदार शशिकांत शिंदे यांना धक्का बसला असून कोरगाव नगरपंचायतीच्या निवडणुकीत राष्ट्रवादीचा पराभव करत शिवसेनेनं बाजी मारली आहे. (सातारा इलेक्शन न्यूज टुडे)

पाटण नगरपंचायतीत गृहराज्यमंत्री शंभूराज देसाई यांनाही पराभव सहन करावा लागला असून पाटणमध्ये राष्ट्रवादीने एकहाती सत्ता मिळवली आहे. लोणंद नगरपंचायतीत काँग्रेसचा पराभव करत आमदार मकरंद पाटील यांनी मैदान मारल्याचं चित्र पाहायला मिळालं. तसंच दहिवडीत भाजपा आमदार जयकुमार गोरे यांना धोबीपछाड देत राष्ट्रवादीच्या प्रभाकर देशमुख यांनी विजयी खेचून आणला आहे.

Dapoli Nagar Panchayat : रामदास कदमांचं वर्चस्व संपलं, अनिल परबांनी करुन दाखवलं; नगरपंचायतीवर शिवसेना-राष्ट्रवादीची सत्ता

डुज नगरपंचायतीत भाजपने काठावर बहुमत मिळवलं आहे, मात्र अपक्ष ४ उमेदवार निवडून आल्याने सत्ता कोण स्थापन करणार, याकडे सर्वांच लक्ष लागून राहिलं आहे. खंडाळा नगरपंचायतीत राष्ट्रवादीने १० जागांवर विजयी मिळवत भाजपचा पराभव केल्याचं पाहायला मिळालं. राष्ट्रवादीचे आमदार मकरंद पाटील यांनी खंडाळा आणि लोणंद या ठिकाणी आपला करिष्मा दाखवला आहे.

सातारा जिल्ह्यात कोणाला किती जागा मिळाल्या; जाणून घ्या सविस्तर निकाल….

वडूज नगरपंचायतीत भाजपचा विजय
भाजप – ६
राष्ट्रवादी – ५
अपक्ष – ४
काँग्रेस – १
वंचित – १

दहिवडी नगरपंचायतीवर राष्ट्रवादीचा झेंडा
राष्ट्रवादी – ८
भाजप – ५
शिवसेना – ३
अपक्ष – १

लोणंद नगरपंचायतीवरही राष्ट्रवादीची सत्ता
राष्ट्रवादी – ९
काँग्रेस – ३
भाजप – ३
अपक्ष – १
समान मते – १

पाटण नगरपंचायत निकाल – राष्ट्रवादी विजयी

राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी – 15
शिवसेना – २

कोरेगाव नगरपंचायतीवर शिवसेनेचा कब्जा

शिवसेना – 13
राष्ट्रवादी – ४

खंडाळा नगरपंचायतीत १० जागा मिळवत राष्ट्रवादीचं निर्विवाद वर्चस्व

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here