हायलाइट्स:

  • डोंबिवलीतील महिलेच्या हत्येचा २४ तासांत उलगडा
  • ओळखीच्या महिलेनेच हत्या केल्याचे झाले उघड
  • सोन्याच्या दागिन्यांसाठी केला गळा आवळून खून
  • आरोपी महिलेला पोलिसांनी केली अटक

डोंबिवली : डोंबिवली पूर्वेतील टिळकनगर परिसरातील एका सोसायटीमधील एका फ्लॅटमध्ये विजया बाविस्कर ( वय ५८) या एकट्या राहत होत्या. रविवारी रात्री त्यांची अज्ञाताने घरात घुसून गळा आवळून हत्या केली होती. या हत्येच्या घटनेने परिसरात खळबळ उडाली होती. अवघ्या २४ तासांमध्ये पोलिसांनी हा गुन्हा उघडकीस आणला. पोलिसांनी या प्रकरणात एका महिलेला अटक केली. सीमा खोपडे ( वय ४०) असे या महिला आरोपीचे नाव आहे. ती विजया बाविस्कर यांना ओळखत होती. सोन्याच्या दागिन्यांच्या मोहापायी तिने ही हत्या केल्याचे प्राथमिक तपासात उघड झाले आहे. मात्र, यामागे आणखी काही कारण आहे का, याचा तपास सुरू आहे, अशी माहिती डोंबिवलीचे सहाय्यक पोलीस आयुक्त जयराम मोरे यांनी दिली.

डोंबिवली पूर्वेतील एका सोसायटीत राहणाऱ्या विजया बाविस्कर या महिलेची तिच्या राहत्या घरी गळा दाबून हत्या करण्यात आल्याची घटना सोमवारी उघडकीस आली. घरकाम करणारी महिला आल्यानंतर ही घटना समोर आली होती. या प्रकरणी टिळकनगर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला होता. मारेकऱ्यांचा शोध घेण्यासाठी एसीपी मोरे यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक पोलीस निरिक्षक वैभव चुंबळे, प्रवीण बाकले, पोलीस उपनिरिक्षक अजिंक्य धोंडे, पोलीस उपनिरिक्षक ममता मुंजाळ, सहाय्यक पोलीस निरिक्षक अविनाश वणवे, पोलीस उपनिरिक्षक सुनील तारमाळे, संदीप शिंगटे, कुलदीप मोरे आणि पोलीस अंमलदार अशी पाच वेगवेगळी पथके तैनात करण्यात आली होती. परिसरातील सीसीटीव्हीच्या फुटेजच्या आधारे पोलिसांनी शोध घेण्यास सुरुवात केली असता, एक महिला अनेक सीसीटीव्हीमध्ये दिसून आली. पोलिसांनी त्यादृष्टीने तपास सुरू केला. त्यानंतर सीमा हिला अटक केली.

gay sex racket : मुंबईत गे सेक्स रॅकेटचा पर्दाफाश; डेटिंग अॅपद्वारे हायप्रोफाइल ग्राहक…
बारामतीत केसरी टूर्स कार्यालयातील महिलेवर चाकू हल्ला; भल्या सकाळी धक्कादायक घटना

सीमा व विजया यांची पूर्वीपासून ओळख होती. विजया या घरी एकट्या राहत होत्या. रविवारी रात्री सोबत म्हणून सीमा त्यांच्या घरी आली होती. विजया यांच्या अंगावरील सोन्याचे दागिने पाहून तिची नियती फिरली. सीमाने विजया यांचा गळा आवळून खून केला. त्यानंतर दाराला बाहेरून कडी लावून ती निघून गेली. सीमा हिने गळा आवळल्यानंतर विजया यांच्या अंगावरील सोन्याचे दागिने चोरल्याची कबुली दिली. यामध्ये आणखी कोणी आरोपी आहे का? मालमत्तेच्या वादातून हत्या झाली आहे किंवा अन्य काही कारण आहे का? याविषयी अधिक तपास पोलीस करत आहेत.

रायगड जिल्हा हादरला! पेणमध्ये एटीएम सेंटरवर दरोडा; ५६ लाख रूपये पळवले
खळबळ! दुचाकीवरून दोघे गावठी बॉम्ब घेऊन रत्नागिरीत येत होते, ATS पथकाला संशय आल्यानंतर…

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here