मुंबई: काही दिवसांपूर्वी प्रेक्षकांच्या भेटीस आलेल्या ” या कार्यक्रमाला प्रेक्षकांची पसंती मिळतेय. किचन आणि कलाकार हे समीकरण जुळलेलं नसताना पाककलेच्या कसोटीला उतरलेल्या कलाकारांची उडणारी तारांबळ बघताना प्रेक्षकांना खूप मजा येतेय.

नेहमी सळसळता उत्साह असणारा अभिनेता हा एक अष्टपैलू कलाकार आहे पण आता तो ‘किचन कल्लाकार’च्या मंचावर येऊन त्याची पाककला दाखवण्याचं शिवधनुष्य पेलवू शकेल की नाही हे प्रेक्षकांना आगामी भागात पाहायला मिळेल. सिद्धार्थला महाराजांनी तांबडा पांढरा रस्सा बनवण्याचं आव्हान दिलं आहे.

त्यावर सिद्धू आश्चर्यचकित होऊन आता काय करू आणि काय नको अशी प्रतिक्रिया देतो. आता सिद्धूला किचनमध्ये तांबडा पांढरा रस्सा बनवायला जमेल की महाराजांना एखादा वेगळाच पदार्थ खायला मिळेल हे येत्या भागात समजेल.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here