जळगाव :मुक्ताईनगर तालुक्यातील बोदवड नगरपंचायत निवडणुकीच्या माध्यमातून राष्ट्रवादी कॉंग्रेसचे नेते एकनाथ खडसे, भाजपचे गिरीश महाजन, शिवसेनेचे पालकमंत्री गुलाबराव पाटील या दिग्गज नेत्यांची प्रतिष्ठा पणाला लागल्याने संपूर्ण जिल्ह्यासह महाराष्ट्राचे लक्ष बोदवड नगरपंचायत निवडणुकीच्या निकालाकडे लागलं होतं. या निवडणुकीचे निकाल समोर आले असून एकनाथ खडसे यांना मोठा धक्का बसला आहे. राष्ट्रवादीला धूळ चारत शिवसेनेनं नगरपंचायतीवर भगवा फडकावला आहे. (बोदवड नगर पंचायत निवडणूक)

या निवडणुकीत शिवसेनेने १७ पैकी नऊ जागांवर विजय मिळवला आहे, तर ईश्वरचिचिठ्ठीने एक जागा भाजपकडे गेली. राष्ट्रवादीचा केवळ ७ जागांवर विजय मिळवता आला. शेवटच्या फेरीपर्यंत अत्यंत चुरशीच्या झालेल्या या निवडणुकीत शिवसेनेनं राष्ट्रवादीला धोबीपछाड दिला.

जालन्यातील पाच नगरपंचायतीचे कल हाती; कोणी उधळला विजयाचा गुलाल?

विजय मिळवल्यानंतर शिवसेनेच्या उमेदवारांनी प्रचंड जल्लोष केल्याचं पाहायला मिळत आहे .

आबांचा पठ्ठ्या लढला आणि जिंकलाही! दिग्गजांना आस्मान दाखवत दणदणीत विजय

दरम्यान, सुरुवातीला या नगरपंचायतीवर भाजपची सत्ता होती. मात्र एकनाथ खडसेंनी राष्ट्रवादीत प्रवेश केल्यानंतर काही काळ राष्ट्रवादी काँग्रेसची सत्ता आली. त्यानंतर नगरसेवकांनी शिवसेनेत प्रवेश केल्याने शिवसेनेनं वर्चस्व मिळवलं होतं आणि आता पुन्हा निवडणुकीत बाजी मारल्याने ही नगरपंचायत शिवसेनेकडेच गेली आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here