आबांचा पठ्ठ्या लढला आणि जिंकलाही! दिग्गजांना आस्मान दाखवत दणदणीत विजय – kavathemahankal nagar panchayat election result: ncp has won under the leadership of rohit rr patil
सांगली : राज्याचे लक्ष लागलेल्या कवठेमहांकाळ नगरपंचायतीच्या निवडणुकीत रोहित आर. आर. पाटील यांनी बाजी मारली आहे. त्यांच्या नेतृत्वाखाली राष्ट्रवादी काँग्रेसच्या पॅनेलने १७ पैकी १० जागांवर विजय मिळवत विरोधकांना धूळ चारली. रोहित पाटील यांची ही पहिली मोठी निवडणूक होती. त्यामुळे याकडे राष्ट्रवादीसह सर्वच राजकीय पक्षांचं लक्ष लागलं होतं. (Kavthe-Mahankal नगर पंचायत निवडणूक निकाल)
कवठेमहांकाळ नगरपालिकेची संपूर्ण जबाबदारी राष्ट्रवादीने रोहित पाटील यांच्या खांद्यावर टाकली होती. हे मैदान मारत त्यांनी आपली ताकद सिद्ध केल्याची चर्चा राजकीय वर्तुळात आता रंगली आहे. या निवडणुकीत त्यांच्याविरोधात सर्वपक्षीय आघाडी झाली होती. पण त्यांच्यावर मात करत त्यांनी विरोधकांना इशारा दिला आहे. माजी खासदार संजयकाका पाटील, शिवसेनेचे नेते अजित घोरपडे, काँग्रेस यांच्या शेतकरी विकास आघाडीने रोहित यांच्यासमोर आव्हान उभं केलं होतं. Sindhudurg Nagar Panchayat Election Results: सिंधुदुर्गात राणेंना मोठा धक्का, कुडाळ-देवगडमध्ये सत्ता गमावली; शिवसेना-भाजप समर्थकांमध्ये राडा
कवठेमहांकाळ नगरपंचायतीच्या पंचवार्षिक निवडणुकीसाठी चुरशीने ८०.४० टक्के मतदान झाले. ४ जागांसाठी हे मतदान झाले. १३ जागांसाठी २१ डिसेंबर रोजी मतदान झाले. ४ प्रभागांसाठीची १८ उमेदवार निवडणूक रिंगणात होते.
दरम्यान, कवठेमंकाळमध्ये राष्ट्रवादीचा दणदणीत विजय झाला. राष्ट्रवादीच्या रोहित पाटलांनी एकहाती सत्ता मिळवली आहे.. कवठेमहांकाळ नगरपंचायतमध्ये राष्ट्रवादीला १० तर शेतकरी विकास आघाडीला ६, अपक्ष १, भाजपला ० जागा मिळाल्या आहेत. या विजयामुळे राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांनी जल्लोष केला. २५ वर्षाच्या तरुणाविरुद्ध सर्वजण एकवटले आहेत? माझं वय २३ चं आहे, २५ होईपर्यंत विरोधकांकडे काहीच ठेवत नाही, असा इशारा माजी गृहमंत्री दिवंगत आर आर पाटील यांचे चिरंजीव रोहित पाटील यांनी सांगली जिल्ह्यातील विरोधकांना दिला होता.
नगरपंचायत निवडणूक प्रचारातील रोहित पाटील यांचे हे भाषण राज्यभर सोशल मीडियावर व्हायरल झाले होते. रोहित पाटील यांनी प्रचारादरम्यान विरोधकांवर तुफानी हल्ला चढवला होता. निकालानंतर तुम्हाला माझा बाप अर्थात आर आर आबांची आठवण होईल, असा इशारा त्यांनी दिला होता. रोहित पाटील यांची प्रचाराची भाषणं चांगलीच गाजली होती.