हायलाइट्स:
- रायगडमधील सहा नगरपंचायत निवडणुकांचा निकाल
- राष्ट्रवादी काँग्रेस, शिवसेनेने मारली जोरदार मुसंडी
- खालापूरमध्ये शिवसेना-राष्ट्रवादीच्या उमेदवारांनी उधळला जेसीबीने गुलाल
रायगड जिल्ह्यातील पोलादपूर, तळा, माणगाव, खालापूर, म्हसळा आणि पाली या नगरपंचायतींसाठी निवडणूक झाली. काल, मंगळवारी या निवडणुकांसाठी मतदान घेण्यात आले. आज, बुधवारी निकाल जाहीर झाले आहेत. राज्यात महाविकास आघाडीचे सरकार असले तरी, रायगड जिल्ह्यातील या निवडणुकांमध्ये चित्र वेगळे होते. राज्यातील सत्ताधारी शिवसेना, राष्ट्रवादी काँग्रेस आणि काँग्रेसचे उमेदवार अनेक ठिकाणी एकमेकांविरोधात उभे ठाकले होते. त्यामुळे या निवडणुका अतिशय रंगतदार झाल्याचे पाहायला मिळाले. रायगड जिल्ह्यात शिवसेना आणि राष्ट्रवादी काँग्रेसने जोरदार मुसंडी मारली आहे. राष्ट्रवादी काँग्रेसने सर्वाधिक ३९ जागांवर विजय मिळवला, तर त्यानंतर शिवसेनेने ३५ जागांवर विजय मिळवला आहे. त्यानंतर शेकापने जिल्ह्यात ११ जागा जिंकल्या आहेत. त्यानंतर काँग्रेसने आठ जागांवर विजय मिळवला आहे. सगळ्यांचे लक्ष लागून राहिलेल्या भाजपला मात्र समाधानकारक कामगिरी करता आली नसल्याचे दिसते. भाजपला केवळ चार जागा जिंकता आल्या. तर इतरांनी तीन जागांवर विजय मिळवला.
कोणत्या नगरपंचायतीत कुणाला किती जागा?
पोलादपूर नगरपंचायत –
शिवसेना – 10
भाजप – १
काँग्रेस-6
तळा
शिवसेना – 4,
राष्ट्रवादी काँग्रेस – 10
भाजप ३
माणगाव
शिवसेना – 7
राष्ट्रवादी काँग्रेस – 8
इतर – २
म्हसळा
शिवसेना – २
राष्ट्रवादी काँग्रेस – 13
काँग्रेस-2
खालापूर
शिवसेना – 8,
शेकाप – ७
राष्ट्रवादी काँग्रेस – २
शिफ्ट
राष्ट्रवादी काँग्रेस 6
शेकाप ४
शिवसेना ४
भाजप २
अपक्ष १