हायलाइट्स:
- ठाण्यातील मुरबाड नगरपंचायत निवडणुकीचा निकाल जाहीर
- भाजपने १० जागा जिंकून पुन्हा सत्ता मिळवली
- आमदार किसन कथोरे यांचे वर्चस्व पुन्हा सिद्ध
- भाजपने मागील निवडणुकीपेक्षा तीन जागा गमावल्या
दरम्यान, मागील निवडणुकीत १७ पैकी १३ जागा मिळवून बहुमतासह विजयी झालेल्या भाजपला यावेळी फक्त १० जागा जिंकता आल्या, तर शिवसेना एका जागेवरून पाच जागांवर पोहोचली. भाजपची सत्ता कायम राहावी म्हणून, आमदार किसन कथोरे आणि केंद्रीय राज्यमंत्री कपिल पाटील यांनी प्रतिष्ठा पणाला लावली होती. तर मागील वेळी एक जागा जिंकणाऱ्या काँग्रेस, राष्ट्रवादीला यावेळी खातेही उघडता आले नाही. तर दोन अपक्षांनी विजय मिळवला आहे.
विजयी उमेदवार
भाजपचे विजय उमेदवार आणि प्रभाग
मानसी देसले – प्रभाग २
राम दुधाळे – प्रभाग 3
नम्रता जाधव – प्रभाग 4
उर्मिला ठाकरे – प्रभाग 8
रविना राव – प्रभाग 9
मुकेश विशे – प्रभाग 11
स्नेहा चेबवणे – प्रभाग १६
मोहन गाडगे – प्रभाग 12
संतोष चौधरी – प्रभाग १३
मधुरा ससे – प्रभाग १५
शिवसेना
विनोद नार्वेकर – प्रभाग ५
नम्रता टिवणे – प्रभाग 6
अक्षय रोटे – प्रभाग ७
मोनिका शेळके – प्रभाग १०
नितीन तिवणे – प्रभाग 14
अपक्ष
दीक्षित वारे – प्रभाग १
अनिता दुधाळे – प्रभाग १७