हायलाइट्स:
- दापोलीत ६ शिवसेना, राष्ट्रवादी ८, शिवसेवा आघाडी अपक्ष २ तर भाजपा १ याप्रमाणे पक्षीय बलाबल आहे
- या सगळ्या निवडणुकीत काँग्रेस पक्षाला एकाही ठिकाणी साधे खातेही उघडता आले नाही
दापोलीत ६ शिवसेना, राष्ट्रवादी ८, शिवसेवा आघाडी अपक्ष २ तर भाजपा १ याप्रमाणे पक्षीय बलाबल आहे. दरम्यान या सगळ्या निवडणुकीत काँग्रेस पक्षाला एकाही ठिकाणी साधे खातेही उघडता आले नाही. गेली पाच वर्षे सेनेकडे असलेले नगराध्यक्षपद हे यावेळी अडीच वर्षे राष्ट्रवादीला दयावे लागणार आहे. तर गेल्या निवडणुकीच्या तुलनेत दापोलीत शिवसेनेची एक जागा कमी झाली. यावेळी सहा जागा शिवसेनेच्या असून राष्ट्रवादीने मोठी बाजी मारली असून तब्बल आठ जागा मिळवल्या. गेल्यावेळपेक्षा राष्ट्रवादीच्या तब्बल चार जागा जास्ती निवडून आल्या आहेत.
निवडणुकीच्या तोंडावर करण्यात आलेला महाआघाडीचा प्रयोग शहरातील सुमारे पन्नास टक्के मतदारांनी नाकारलेला दिसून आला. शहरातील मूळ शिवसेनेचे चारही अधिकृत उमेदवार या निवडणुकीत पराभूत झाल्याने अधिकृत शिवसेनेचा शहरातील एकही उमेदवार सभागृहात जाऊ शकलेला नाही. याचबरोबर आमदार योगेश कदम यांच्या पाठिंब्याने शिवसेनेच्या बंडखोर शहर विकास आघाडीने निवडणुकीत जोरदार मुसंडी मारलेली दिसून आली.
मंडणगड नगरपंचायत निकाल खालीलप्रमाणे
प्रभाग क्रमांक 1 आदर्श नगर: सुमित्रा निमदे (अपक्ष) मते 62 सोनल बेर्डे (अपक्ष) मते 62 पुजा सापटे (शिवसेना) मते 57 मते समान झाल्याने चिठ्ठीवर अपक्ष उमेदवार सोनले बेर्डे विजयी
प्रभाग क्रमांक 2 बोरीचा माळ: सेजल गोवळे (अपक्ष) मते 123 श्रध्दा चिले (शिवसेना) मते 54 शाहीन सय्यद (राष्ट्रवादी) मते102 अपक्ष उमेदवार सेजल गोवळे विजयी झाल्या,
प्रभाग क्रमांक 3 केशवशेठ लेंडे नगर: प्रियांका लेंडे (राष्ट्रवादी) मते 95 नम्रता पिंपळे (अपक्ष)मते 61 राष्ट्रवादी प्रियाका लेंडे विजयी झाल्या.
प्रभाग क्रमांक 4 शिवाजी नगर: मुश्ताक दाभिळकर (अपक्ष) मते 117 दिपक घोसाळकर(राष्ट्रवादी) मते 63 ऋण प्राणा मुश्ताक दाभिळकर (अपक्ष) मते 117
श्रीपाद कोकाटे (काँग्रेस) मते 33 अपक्ष उमेदवार मुश्ताक दाभिळकर विजयी
प्रभाग क्रमांक 5 साईनगर योगेश जाधव (अपक्ष) मते 129 राजाराम लेंढे (राष्ट्रवादी) मते 94 अनुराग कोंळबेकर (भाजपा) 01 अपक्ष उमेदवार योगेश जाधव विजयी.
प्रभाग क्रमांक 6 दुर्गवाडी 2 सुभाष सापटे (राष्ट्रवादी) मते 102 नरेश बैकर (अपक्ष) मते 65 राष्ट्रवादी सुभाष सापटे विजयी
प्रभाग क्रमांक 7 सापटेवाडी संजय सापटे(शिवसेना) मते 49 निलेश सापटे(अपक्ष) मते 54 महेंद्र सापटे (अपक्ष) मते 16 अपक्ष उमेदवार निलेश सापटे विजयी.
प्रभाग क्रमांक 8 दुर्गवाडी 1 राजेश्री सापटे (राष्ट्रवादी) मते 74 प्रिया पोस्टुरे (अपक्ष) मते 62 राष्ट्रवादीच्या राजेश्री सापटे विजयी.
प्रभाग क्रमांक 9 भेकतवाडी अश्विनी गोरीवले (शिवसेना) मते 55 प्रमिला किंजळे (अपक्ष) मते 65 अपक्ष उमेदवार प्रमिला किंजळे विजयी
प्रभाग क्रमांक 10 कोंझर मुकेश तलार (राष्ट्रवादी) मते 70 विश्वदास लोखंडे (भाजपा) मते 24 मंदार वारणकर (मनसे) मते 00 राष्ट्रवादीचे मुकेश तलार विजयी.
प्रभाग क्रमांक 11 धनगरवाडी विनोद जाधव (अपक्ष) मते 89 तुषार साठम(शिवसेना) मते 17 अपक्ष उमेदवार विनोद जाधव विजयी
प्रभाग क्रमांक 12 तुरेवाडी-कुंभारवाडी मनिषा हातमकर (राष्ट्रवादी) मते 59 पुर्वा जाधव (अपक्ष) मते 45 राष्ट्रवादीच्या मनिषा हातमकर विजयी.
प्रभाग क्रमांक 13 बौध्दवाडी 1 आदेश मर्चंडे (अपक्ष) मते 47 सुप्रिया मर्चंडे (अपक्ष) मते 40 अपक्ष उमेदवार आदेश मर्चंडे विजयी.
प्रभाग क्रमांक 14 बौध्दवाडी 2 अंजली मर्चंडे (अपक्ष) मते 37 रेश्मा मर्चंडे (अपक्ष) मते 59 अपक्ष उमेदवार रेश्मा मर्चंडे विजयी.
प्रभाग क्रमांक 15 गांधीचौक 2 वैशाली रेगे (अपक्ष) मते 37 प्रमिला कामेरीकर (राष्ट्रवादी) मते 22 अपक्ष उमेदवार वैशाली रेगे विजयी.
प्रभाग क्रमांक 16 गांधीचौक 1 वैभव कोकाटे (राष्ट्रवादी) मते 48 मनोज अधिकारी (अपक्ष) मते 34 राष्ट्रवादीचे वैभव कोकाटे विजयी
प्रभाग क्रमांक 17 तुरेवाडी-सोनारवाडी समृध्दी शिगवण (राष्ट्रवादी) मते 76 शारदा बने (अपक्ष) मते30 सोनल पवार (मनसे) मते 28 राष्ट्रवादीच्या समृध्दी शिगवण विजयी
Ratnagiri News | रत्नागिरी बातमी | Ratnagiri News in Marathi | Ratnagiri Local News – Maharashtra Times