हायलाइट्स:
- राजू शेट्टी सरकारविरोधात आक्रमक
- शेतकऱ्यांच्या मुद्द्यावरून केली टीका
- आंदोलक हावभाव
राजू शेट्टी यांनी महाविकास आघाडीवर टीका करताना राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी केलेल्या एका वक्तव्याचीही आठवण करून दिली आहे. ‘महाविकास आघाडी स्थापन करताना शेतकऱ्यांना चांगले दिवस येतील, असं माजी केंद्रीय मंत्री शरद पवार म्हणाले होते. आता त्यांनी याबाबत त्यांची भूमिका काय हे स्पष्ट करावं,’ असं आव्हान शेट्टी यांनी दिलं आहे.
‘शेतकऱ्यांना सुमारे ७० टक्के कमी मोबदला मिळणार’
‘राज्य सरकारने ६ ऑक्टोबर २०२१ आणि १४ जानेवारी २०२२ रोजी प्रकल्पांसाठीच्या जमिनींबाबतची परिपत्रके काढली आहेत. काटकसरीच्या नावाखाली शेतकऱ्यांच्या जमिनी कमी किमतीत घेतल्या जाणार असतील तर प्रकल्प बंद केले जातील. या निर्णयांमुळे शेतकऱ्यांना सुमारे ७० टक्के कमी मोबदला मिळणार आहे. राज्य सरकारने आतापर्यंत किती जमिनी घेतल्या? किती जमिनींचा वापर करण्यात आला? या बाबतची श्वेतपत्रिका जाहीर करावी,’ अशी मागणीही राजू शेट्टी यांनी केली आहे.
दरम्यान, काँग्रेसचं सरकार असताना २०१३ मध्ये भूमी अधिग्रहण कायदा करण्यात आला. केंद्र सरकारने या कायद्यामध्ये दुरुस्ती करण्याचा प्रयत्न केला. मात्र, तो अयशस्वी झाला. याबाबत राज्यांनी दुरुस्ती करण्याचे कळवण्यात आले. त्यानुसार राज्य सरकारने दोन परिपत्रक काढली आहेत, असं शेट्टी यांनी म्हटलं आहे.