हायलाइट्स:
- चित्रा वाघ यांनी राष्ट्रवादी काँग्रेसला फटकारले असले तरी कवठे-महंकाळ नगरपंचायतीमध्ये दणदणीत विजय मिळवणाऱ्या रोहित पाटील यांचे त्यांनी कौतुक केले आहे
- चित्रा वाघ यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना अप्रत्यक्ष टोला लगावला आहे
एकीकडे चित्रा वाघ यांनी राष्ट्रवादी काँग्रेसला फटकारले असले तरी कवठे-महंकाळ नगरपंचायतीमध्ये दणदणीत विजय मिळवणाऱ्या रोहित पाटील यांचे त्यांनी कौतुक केले आहे. रोहीत तुझं खूप अभिनंदन… कोणतं पद असो की नसो… आबांची नाळ जनतेशी कायम जोडलेली असायची. आबांच्या पावलांवर पाऊल टाकत तू हा जनसेवेचा वारसा पुढे सुरू ठेवला.. त्याचं फळ तुला आज मिळालंय. हे यश तुझं आहे. आज आबा असते तर त्यांना तुझा अभिमान वाटला असता…, असे चित्रा वाघ यांनी ट्विटमध्ये म्हटले आहे.
राज्यातील १०६ पैकी ९६ नगरपंचायतींचे निकाल आतापर्यंत जाहीर झाले आहेत. यामध्ये राष्ट्रवादी काँग्रेसने सर्वाधिक २६, भाजप २५, काँग्रेस २१, शिवसेना १७ तर अपक्षांनी ८ नगरपंचायतींमध्ये सत्ता हस्तगत केली आहे. भाजपाला २४ नगरपंचायती आणि ४१६ जागा मिळाल्या असून राष्ट्रवादी काँग्रेसला २५ नगरपंचायती आणि ३८७ जागा मिळाल्या आहेत. तर काँग्रेसला १८ नगरपंचायची आणि २९७ जागा तसंच शिवसेनेला १४ नगरपंचायती आणि ३०० जागा मिळाल्या आहेत. म्हणजे महाविकास आघाडीला एकूण ५७ नगरपंचायती आणि ९७६ जागा तर भाजपाला २४ नगरपंचायती ४१६ जागा मिळाल्या आहेत.
‘शिवसैनिक आता फार काळ शांत राहणार नाहीत’
महाविकासआघाडी सरकारमधील तिन्ही पक्षांमध्ये प्रचंड अंतर्गत बेबनाव आहे. त्यामुळे लवकरच महाविकासआघाडीचा डोलारा कोसळेल. त्यामुळे राज्यात मध्यावधी निवडणुका होऊ शकतात, असे भाकीत भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील (Chandrakant Patil) यांनी वर्तविले आहे. महाविकासआघाडीचे सरकार कोसळल्यास त्यामधील तिन्ही पक्षांपैकी एकाशीही युती करण्याची भाजपची इच्छा नाही. भाजपचे कार्यकर्तेच त्यासाठी तयार होणार नाहीत. त्यामुळे राज्यात मध्यावधी निवडणुका अटळ असल्याचे संकेत चंद्रकांत पाटील यांनी दिले.