मुंबई : गानसम्राज्ञी लता मंगेशकर यांच्यावर ब्रीच कँडी रुग्णालयात उपचार सुरू आहेत. त्यांच्यावर सध्या उपचार सुरू असले तरी त्यांची प्रकृती सुधारत असून लवकरच डॉक्टरांच्या सल्ल्यानंतर त्यांना डिस्चार्ज देण्यात येईल, असं म्हटलं जात आहे.

मुंबईमध्ये पसरणाऱ्या तिसऱ्या लाटेमध्ये लता मंगेशकर यांनाही करोनासंसर्ग झाल्याचं समोर आलं होतं.त्या ९२ वर्षांच्या आहेत. त्यांना वैद्यकीय देखरेखीसाठी ब्रीच कँडी रुग्णालयात अतिदक्षता विभागात दाखल करण्यात आलं होतं. ब्रीच कँडी रुग्णालयाचे डॉ. प्रतीक समधानी यांनी ‘इकॉनॉमिक टाइम्स’ला दिलेल्या माहितीनुसार लता दीदींनी करोनासोबतच न्यूमोनियाही झाला होता. त्यांचं वय पाहता, प्रकृती सुधारण्यास वेळ लागेल, असंही त्यांनी म्हटलं होतं. रुग्णालयात दाखल केल्यानंतर त्यांची प्रकृती गंभीर असल्याचं डॉक्टरांनी सांगितलं होतं, तसंच त्या लवकर बऱ्या व्हाव्या, यासाठी प्रार्थना करा, असं आवाहनही डॉक्टरांनी केलं होतं. लता दीदींच्या जगभरातील चाहत्यांनी केलेल्या प्रार्थनेमुळं लता दीदींची प्रकृती सुधारते आहे.

लता दीदींना यांना डिस्चार्ज देण्यापूर्वी डॉक्टरांना त्या पूर्णपणे बरे झाल्याची खात्री करून घ्यायची आहे. लता मंगेशकर यांची भाची रचना शाह यांनी दीदींच्या तब्येतीविषयी माहिती दिली आहे. ‘दीदींची तब्येत स्थीर आणि व्यवस्थीत आहे. देवाची कृपा आहे. त्या लढवय्या आहेत. आपण त्यांना इतकी वर्षे ओळखत आहोत. त्यांच्या चाहत्यांनी केलेल्या प्रार्थनेमुळं त्यांची तब्येत सुधारतेय. त्यांचे खूप आभार’, असं रचना शाह म्हणाल्या.
उषा मंगेशकरांनी सांगितलं लता दीदींना कधी मिळू शकतो डिस्चार्ज
सन २०१९ च्या नोव्हेंबरमध्ये श्वसनाचा त्रास होऊ लागल्यानं त्यांना रुग्णालयात दाखल करण्यात आलं होतं. त्यांना त्या वेळी छातीमध्ये जंतूसंसर्ग झाला होता. त्या वेळी सुमारे २८ दिवस त्यांच्यावर उपचार करण्यात आले होते.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here