औरंगाबाद : औरंगाबाद गृहनिर्माण व क्षेत्रविकास मंडळांतर्गत चिकलठाणा येथे १७२८ सदनिका तयार करण्याचा प्रकल्प तयार करण्याचे नियोजित करण्यात आले आहे. हा प्रकल्प मराठवाड्यात दुसरा सर्वात मोठा प्रकल्प आहे. या प्रकल्पाला महानगर पालिकेकडून मंजूरी मिळाली नसल्याने हा प्रकल्प अजुनही सूरू झालेला नाही.

औरंगाबाद शहरात म्हाडा अंतर्गत नक्षत्रवाडी येथे ३२० सदनिकांचा प्रकल्प तयार करण्यात आलेला आहे. याशिवाय पडेगाव येथील ५२८ घरांचा दुसरा प्रकल्प सुरू आहे. हा प्रकल्प आगामी वर्षात पूर्ण केला जाणार आहे. तर वळदगाव येथे २४० घरांचा तिसरा प्रकल्प असून चौथा प्रकल्प चिकलठाणा येथे १७२८ घरांचे असे चार प्रकल्प तयार करण्यात आलेले आहे. चिकलठाणा येथील १७२८ घरांच्या प्रकल्पासाठी असलेल्या जमीनीबाबत न्यायलयीन प्रकरण सुरू होते. सदर प्रकरण न्यायलयात असल्यामुळे या प्रकल्पासाठी जागेचा ताबा मिळाला नव्हता. म्हाडाच्या अधिकाऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार चिकलठाणा येथील प्रकल्पाला जागा मिळालेली आहे. सदर जागेवर बांधकाम करण्यासाठी आवश्यक तांत्रिक बाबींची मंजुरी महानगर पालिकेकडून घेण्यासाठी प्रस्ताव देण्यात आला आहे.

लवकरच डोक्यावरील टोपी निघणार; अब्दुल सत्तार यांची दानवेंवर खोचक टीका
चिकलठाणा येथील प्रकल्पाला तांत्रिक बाबींची मान्यता महापालिकेकडून मिळालेली नाही. यााबाबत पत्रव्यवहारही सुरू आहे. करोनामुळे म्हाडाच्या अधिकाऱ्यांनी पाठपूरावा कमी केला होता. मात्र या कामासाठी गेल्या काही महिन्यात वेग वाढविण्यात आला आहे. महापालिकेकडून मंजुरी मिळाल्यानंतर नियोजित जागेवर बांधकाम करण्यासाठी निवीदा काढण्यात येणार आहे. ही प्रक्रिया आगामी काही महिन्यात होण्याची शक्यता वर्तविण्यात येत आहे. चिकलठाणा येथील १७२८ घरांच्या बांधकामासाठी दोन ते अडीच वर्ष लागण्याची शक्यता असल्याची माहितीही म्हाडाकडून देण्यात आली आहे.

२०२२ पर्यंत सर्वांसाठी घरे देण्याचे होते लक्ष्य

प्रधानमंत्री आवाज योजनेतंर्गत २०२२ पर्यंत औरंगाबाद विभागांतर्गत एकुण ६२४० घरे देण्याचे लक्ष्य ठेवण्यात आले होते. यात अत्यअल्प उत्पन्न गटातील ४३६८ जणांना घरे देण्यात येणार होते. तर अल्प उत्पन्न गटात ३५६ घरे होती. आणि मध्यम उत्पन्न गटात ६२४० घरे देण्याचे नियोजित करण्यात आले होते. मात्र गेल्या दोन वर्षांपासून करोनामुळे यातील अनेक प्रकल्प पूर्ण झालेले नाहीत. काही प्रकल्प अंतिम टप्प्यात आहेत.

Nagar Election Result Highlights: कुणी जावा-जावा, कुणी सासू-सुना तर कुणी चुलते पुतणे; भावकीतल्या ९ जणांनी विजयाचा गुलाल उधळला!

प्रधानमंत्री आवास योजनेतील योजना

योजनेचे स्थान एकूण सदनिका

नक्षत्रवाडी – 320

जालना – ३६४

एमआयडीसी लातूर – २४००

पडेगाव औरंगाबाद – ५२८

चिकलठाणा औरंगाबाद – १७२८

वेदगाव औरंगाबाद – 240

अंबाजोगाई, बीड – ४८०

हिंगोली – १८०

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here