औरंगाबाद : उपचाराआडून गुंगीचे औषध देऊन एका डॉक्टर महिलेवर भोंदू हकीमकडून अत्याचार केल्याचा धक्कादायक प्रकार औरंगाबादमध्ये समोर आला आहे. तर याप्रकरणी बेगमपुरा पोलिसांनी महिनाभरानंतर या भोंदू हकिमला बेड्या ठोकल्या असून, न्यायालयाने २ दिवसांची पोलीस कोठडी देऊन त्यानंतर न्यायालयीन कोठडीत रवानगी केली.

मिळालेल्या माहितीनुसार, बेगमपुरा भागातील एका महिला डॉक्टरचे नेहमी डोके दुखायचं. शहरातील अनेक मोठं-मोठ्या डॉक्टरांकडून तपासण्या केल्यानंतरही डोके दुखणे थांबले नाही. याचवेळी ओळखीच्या व्यक्तीकडून मुश्ताक शेख उमर शेख (मूळ रा. मालेगाव, नाशिक, ह.मु. रहेमानिया कॉलनी) या भोंदू हकीमबद्दल महिलेला माहिती मिळाली. त्यामुळे त्याला उपचारासाठी बोलवण्यात आलं. यावेळी कस्तुरी एक महिना घरात ठेवल्यानंतर आत्मा घरातून निघून जाईल व त्यानंतरच डोकेदुखी कमी होईल, अशी थाप भोंदूने मारली. त्यासाठी तीन लाखांचा खर्चही सांगितला.

मोदी लाटेत उद्ध्वस्त झालेल्या काँग्रेसला विदर्भात नवसंजीवनी
दोन वेळा घरात कस्तुरी ठेवत उपचार सुरू असल्याचे सांगत या भोंदू हकीमने प्रत्येकी एक लाख रुपये घेतले. पण तिसऱ्यावेळी त्याने पीडितेला एकटीलाच खोलीत ठेवून उपचार करावे लागतील, असे सांगून बाकीच्या लोकांना घराबाहेर काढले. यावेळी त्याने पीडितेला गुंगीचे औषध देऊन बलात्कार केला.

दुसऱ्या दिवशी पुन्हा त्याने तसाच अत्याचार केला. या घटनेनंतर पीडितेने आईला हकिकत सांगितली. तेव्हा आईसह नातेवाईकांनी अत्याचाराचा जाब भोंदूला विचारल्यावर त्याने पीडितेसोबत लग्न करण्याची थाप मारली. त्यानंतर त्याने २८ नोव्हेंबर २०२१ पर्यंत वारंवार अत्याचार केले, पण लग्न करत नसल्याने अखेर त्याविरुद्ध पोलिसात तक्रार दाखल करण्यात आली.

ST Strike News : एसटी कर्मचाऱ्यांवर उपासमारीची वेळ; रोजगाराच्या शोधात सुरू केली ‘ही’ कामं

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here