हायलाइट्स:

  • रत्नागिरीत नगरपंचायत निवडणूक निकालानंतर धुसफूस सुरू
  • शिवसेनेतील अंतर्गत कलह पुन्हा चव्हाट्यावर
  • शिवसेना नेत्यांवर आमदार योगेश कदम यांचा गंभीर आरोप
  • काही नेत्यांनी राष्ट्रवादीला मदत केल्याच्या आरोपाने खळबळ

रत्नागिरी : कोकणातील रत्नागिरी जिल्ह्यात दापोली आणि मंडणगड नगरपंचायत निवडणूक निकालानंतर दुसऱ्याच दिवशी शिवसेनेतील धुसफूस समोर आली आहे. शिवसेना आमदार योगेश कदम यांनी शिवसेनेच्या काही नेत्यांवर गंभीर आरोप केला आहे. काही नेत्यांनी राष्ट्रवादी काँग्रेस वाढवण्याचे काम केले, असा आरोप त्यांनी केला आहे.

नगरपंचायत निवडणुकीदरम्यान शिवसेना नेते रामदास कदम आणि पालकमंत्री अनिल परब यांच्यातील सुरू असलेला वाद निकालानंतर पुन्हा एकदा पेटल्याचे चित्र आहे. शिवसेना आमदार योगेश कदम यांनी शिवसेनेच्या काही नेत्यांवर निशाणा साधला आहे. दापोली आणि मंडणगड निवडणूक निकालानंतर मनातील सल त्यांनी बोलून दाखवली आहे. शिवसेनेचे खच्चीकरण करायचे आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे बळ वाढवायचे अशी छुपी नीती दुर्दैवाने आमच्या काही नेत्यांची होती आणि ती दापोलीत यशस्वी झाली, असा आरोप आमदार कदम यांनी कुणाचेही नाव न घेता केला आहे. मंडणगडमध्ये जे शिवसैनिक अपक्ष म्हणून उभे राहिले, ते आठ जण निवडून आले आहेत. मंडणगडध्ये शिवसेनेचाच नगराध्यक्ष बसेल, असा विश्वासही कदम यांनी व्यक्त केला.

मंडणगड नगरपंचायतीत शहर विकास आघाडीला सात जागांवर यश

Mandangad Nagar Panchayat Election: मंडणगड नगरपंचायतीत रामदासभाईंचा शिवसेनेला इंगा, सर्व उमेदवार पाडले; बंडखोरांना दणदणीत यश

राष्ट्रवादीलाच फायदा झाला!

शिवसेनेच्या काही नेत्यांमुळेच दापोली शहरात राष्ट्रवादीला फायदा झाला. जे शिवसेनेचे सहा उमेदवार निवडून आले आहेत, त्यातील चार जण हे एबी फॉर्म भरण्याआधी राष्ट्रवादीतून शिवसेनेत आले होते. यात शिवसेनेचा कोणताही फायदा झालेला नाही. राष्ट्रवादीला बळ देण्याचे काम आमच्याच काही नेत्यांनी केले, असा गंभीर आरोपही आमदार योगेश कदम यांनी केला. नाराजांनी अपक्ष म्हणून निवडणूक लढवली. त्यांना मिळालेली मते ही जास्त आहेत. हा निर्णय शिवसैनिकांना आवडला नव्हता, हेच यातून स्पष्ट झाले. गेली पाच वर्षे शिवसेनेची सत्ता होती. नगराध्यक्ष आमचा होता; पण यावेळी परस्पर केलेल्या आघाडीमुळे सेनेचे नुकसान झाले, असंही ते म्हणाले. अपक्षांना मिळालेल्या मतांवरून, दापोलीतील शिवसैनिक जागेवरच आहे, हे सिद्ध झाले आहे. रामदासभाई आणि मी पूर्णपणे या निवडणुकीपासून अलिप्त होतो. प्रचारामध्ये आम्ही कुठेही सहभाग घेतला नाही, असेही त्यांनी यावेळी सांगितले.

दापोली नगरपंचायतीवर राष्ट्रवादीच्या मदतीने भगवा फडकवला

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here