नारायण राणे यांच्यावर अटकेची कारवाई झाली तेव्हा तर त्यांनी थेट नावही घेतले नव्हते. पण नाना पटोले थेट नाव घेऊन बोलले आहेत. त्यानंतर नाना पटोले यांनी मी मोदी नावाच्या गावगुंडाबद्दल बोललो, अशी सारवासारव केली.

Nilesh Rane

राज्य सरकारने सर्वांना समान न्याय या वृत्तीने नाना पटोले यांच्यावर गुन्हा दाखल केलाच पाहिजे, अशी मागणी निलेश राणे यांनी केली.

हायलाइट्स:

  • ठाकरे सरकार असे म्हटले जात असले तरी त्यामध्ये ठाकरे आहेतच कुठे?
  • ते गेल्या पाच महिन्यांपासून कंबर पकडून घरी बसले आहेत

सिंधुदुर्ग: काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना मारण्याची भाषा करुनही पोलीस त्यांच्यावर गुन्हा दाखल करुन घ्यायला तयार नाहीत. राज्य सरकारने सर्वांना समान न्याय लावला पाहिजे. आज तुमची सत्ता आहे. उद्या आमची सत्ता असेल. तेव्हा काय होईल, याचा विचार सत्ताधाऱ्यांनी करावा. आम्ही तर दयामायाही दाखवत नाही, असे वक्तव्य भाजप नेते निलेश राणे (Nilesh Rane) यांनी केले. ते बुधवारी सिंधुदुर्गात प्रसारमाध्यमांशी बोलत होते.

यावेळी निलेश राणे यांनी नाना पटोले यांच्यावर आगपाखड केली. पंतप्रधान हे संविधानिक पद आहे. त्यामुळे नाना पटोले यांनी त्यांच्या वक्तव्याबद्दल माफी मागितली पाहिजे. नाना पटोले यांनी ते काय बोलतात, हेच समजत नाही. त्यांनी पंतप्रधान मोदींविषयी विधान केले तेव्हा ते शुद्धीत तरी होते का, कारण तेव्हा रात्र होती. नारायण राणे यांच्यावर अटकेची कारवाई झाली तेव्हा तर त्यांनी थेट नावही घेतले नव्हते. पण नाना पटोले थेट नाव घेऊन बोलले आहेत. त्यानंतर नाना पटोले यांनी मी मोदी नावाच्या गावगुंडाबद्दल बोललो, अशी सारवासारव केली. पण तपासात तशी कोणतीही व्यक्ती आढळली नाही. त्यामुळे नाना पटोले आता घाबरले असून बॅकफूटवर गेले आहेत. पण राज्य सरकारने सर्वांना समान न्याय या वृत्तीने नाना पटोले यांच्यावर गुन्हा दाखल केलाच पाहिजे, अशी मागणी निलेश राणे यांनी केली.

मोदी या स्थानिक गुंडाविषयी बोललो; व्हायरल व्हिडीओवर नाना पटोले अखेर बोलले

‘सरकारमध्ये ठाकरे आहेतच कुठे, ते कंबर पकडून घरी बसलेत’

ठाकरे सरकार असे म्हटले जात असले तरी त्यामध्ये ठाकरे आहेतच कुठे? ते गेल्या पाच महिन्यांपासून कंबर पकडून घरी बसले आहेत. पण राज्य सरकार म्हणून पोलीस काय भूमिका घेत आहेत? गृहखाते हे राष्ट्रवादी काँग्रेसकडे आहे. त्यामुळे त्यांनी सर्वांना समान न्याय लावला पाहिजे, असेही निलेश राणे यांनी म्हटले.

नाना पटोले प्रकरणात आता अमृता फडणवीसांचीही एंट्री

सात दिवसांमध्ये कारवाई करा अन्यथा कोर्टात जाऊ: चंद्रशेखर बावनकुळे

राज्य सरकारने नाना पटोले यांच्यावर सात दिवसांत कारवाई करावी. अन्यथा भाजप न्यायालयात जाईल, असा इशारा भाजपचे नेते चंद्रशेखर बावनकुळे यांनी दिला आहे.

जवळच्या शहरातील बातम्या

मराठी बातम्या अॅप: तुम्हालाही तुमच्या अवतीभवती होत असलेल्या बदलांमध्ये सहभागी व्हायचं आहे? सिटिझन रिपोर्टर अॅप डाउनलोड करा आणि रिपोर्ट्स पाठवा.

वेब शीर्षक: भाजप नेते नीलेश राणे यांनी नरेंद्र मोदींबद्दलच्या वक्तव्यावरून काँग्रेस नेते नाना पटोले यांच्यावर टीका केली.
मराठी बातम्या महाराष्ट्र टाइम्स, टीआयएल नेटवर्क कडून

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here