हायलाइट्स:

  • जिवापेक्षा ‘सेल्फी’ महत्त्वाचा
  • मृत्यू समोर उभा असतानाही महिला घेत होती सेल्फी
  • बर्फाच्या पाण्यात बुडणाऱ्या गाडीवर उभी राहून महिलेचा प्रताप

टोरंटो, कॅनडा :

कल्पना करा… आपली गाडी बर्फाळलेल्या नदीच्या पाण्यावर उभी आहे… गाडी विरघळलेल्या बर्फाच्या पाण्यात अचानक बुडू लागली… तर समोर मृत्यू पाहून तुम्ही काय कराल… असाच प्रसंग ओढावलेल्या एका महिलेनं त्यावेळी गाडीच्या छतावर चढून आपला सेल्फी घेतला… आणि तो सोशल मीडियावरदेखील पोस्ट केलाय. हा फोटो सोशल मीडियावर व्हायरल झालाय.

ओटावाच्या मनोटिकच्या रिड्यू नदीच्या परिसरात ही घटना घडली. महिला गाडी चालकावर धोकादायक ड्रायव्हिंगचा आरोप स्थानिक पोलिसांकडून लावण्यात आलाय. सोशल मीडियावर व्हायरल झालेल्या फोटोमध्ये संबंधित महिला आपल्या पिवळ्या रंगाच्या बुडत्या कारच्या छतावर उभी राहून सेल्फी घेताना दिसून येत आहे.

‘द मिरर’नं दिलेल्या वृत्तानुसार, बर्फाळ नदीत बुडणाऱ्या कारच्या छतावर उभी राहून अत्यंत धोकादायक परिस्थितीत ही महिला आनंदाने सेल्फी घेत होती. उल्लेखनीय म्हणजे, यावेळेला आजूबाजूला उपस्थित असलेले स्थानिक या महिलेला वाचवण्यासाठी आरडाओरड करत होते.

Anne Frank betrayal: १५ वर्षांची ‘अॅनी फ्रँक’ कुणामुळे नाझींच्या हाती लागली? ७७ वर्षानंतर रहस्य उलगडलं…Boxing champion Mohammad Javad: भ्रष्टाचाराचा विरोध महागात! बॉक्सरला मृत्यूदंडाच्या शिक्षेचं फर्मान
मात्र कोणतीही अनुचित घटना घडण्याअगोदरच दोरीने बांधलेल्या बोटीच्या साहाय्यानं या महिलेला बुडणाऱ्या गाडीतून सुखरूप बाहेर काढण्यात आलं. ज्यावेळी ही बोट महिलेपर्यंत पोहोचली तोव्हापर्यंत तिची गाडी जवळजवळ पूर्णपणे पाण्यात बुडालेली होती आणि गाडीचं केवळ छत लोकांना दिसत होतं.

महिलेला बाहेर काढण्यात आल्यानंतर ही गाडी पूर्णत: पाण्यात बुडाली. बर्फाच्या तलावावर किंवा नदीवर बेजबाबदारपणे फिरणं जिवावर बेतू शकतं, असा इशारा अधिकाऱ्यांकडून देण्यात आलाय.

कॅनडामध्ये बर्फावर गाडी चालवणं अवैध नाही. कारण थंडीच्या दिवसांत अनेकदा इथं अशी स्थिती उत्पन्न होण्याची शक्यता असते.
Covid 19 : पाळीव प्राण्यांत संसर्ग! हाँगकाँगमध्ये २००० हॅम्स्टर मारण्याचे आदेश जारी
चिंताजनक : माणसांकडून प्राण्यांमध्येही फैलावतोय करोना, तीन सिंह ‘डेल्टा’नं संक्रमित

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here