साताऱ्यातील गुळूंब या गावात सुरु असलेले ‘मुलगी झाली हो’ या मालिकेचे चित्रीकरण थांबवण्यात आले आहे. गुरुवारी संभाजी ब्रिगेडचे कार्यकर्ते मालिकेच्या सेटवर दाखल झाले. यावेळी त्यांनी पॅनारोमा प्रॉडक्शनच्या अधिकाऱ्यांशी बोलायचे असल्याचे सांगितले.

संभाजी ब्रिगेडचे कार्यकर्ते ‘मुलगी झाली हो’च्या सेटवर ठिय्या मांडून बसले आहेत.
हायलाइट्स:
- किरण माने यांनी मुंबईत राष्ट्रवादी काँग्रेसचे सर्वेसर्वा शरद पवार यांची भेट घेऊन आपली बाजू मांडली होती
- संभाजी ब्रिगेडचे कार्यकर्ते ‘मुलगी झाली हो’च्या सेटवर ठिय्या मांडून बसले आहेत
तर दुसरीकडे साताऱ्यातील गुळूंब या गावात सुरु असलेले ‘मुलगी झाली हो’ या मालिकेचे चित्रीकरण थांबवण्यात आले आहे. गुरुवारी संभाजी ब्रिगेडचे कार्यकर्ते मालिकेच्या सेटवर दाखल झाले. यावेळी त्यांनी पॅनारोमा प्रॉडक्शनच्या अधिकाऱ्यांशी बोलायचे असल्याचे सांगितले. यानंतर संभाजी ब्रिगेडचे कार्यकर्ते ‘मुलगी झाली हो’च्या सेटवर ठिय्या मांडून बसले आहेत. त्यामुळे आता पुढे काय घडणार, याची उत्सुकता सर्वांना लागली आहे.
काही दिवसांपूर्वीच किरण माने यांनी मुंबईत राष्ट्रवादी काँग्रेसचे सर्वेसर्वा शरद पवार यांची भेट घेऊन आपली बाजू मांडली होती. सोशल मीडियावर राजकीय स्वरुपाच्या पोस्ट केल्याने आपल्याला मालिकेतून काढण्यात आले. हा एकप्रकारचा सांस्कृतिक दहशतवाद असल्याचे सांगत किरण माने यांनी शरद पवार यांच्याकडे दाद मागितली होती. मात्र, त्यावर शरद पवार किंवा राष्ट्रवादी काँग्रेसकडून कोणतीही अधिकृत भूमिका मांडण्यात आली नव्हती. तर मंत्री जितेंद्र आव्हाड यांनी त्यापूर्वीच किरण माने यांना पाठिंबा जाहीर केला होता.
दरम्यानच्या काळात ‘मुलगी झाली हो’ मालिकेतील काही प्रमुख कलाकारांनी किरण माने यांची सेटवरील वर्तणूक चांगली नसल्याचे म्हटले होते. ते सहकारी कलाकारांना सतत टोमणे मारतात किंवा आक्षेपार्ह भाषा वापरतात, असे या कलाकारांचे म्हणणे होते. मात्र, त्यानंतर काहीवेळातच मालिकेतील अन्य कलाकारांनी किरण माने यांच्या पाठिशी ठामपणे उभे राहत त्यांच्या वर्तनात कोणतीही उणीव नसल्याची भूमिका घेतली होती. त्यामुळे या सगळ्या वादावर कोणताही तोडगा निघू शकला नव्हता.
जवळच्या शहरातील बातम्या
मराठी बातम्या अॅप: तुम्हालाही तुमच्या अवतीभवती होत असलेल्या बदलांमध्ये सहभागी व्हायचं आहे? सिटिझन रिपोर्टर अॅप डाउनलोड करा आणि रिपोर्ट्स पाठवा.
या बातम्यांबद्दल अधिक वाचा
मराठी बातम्या महाराष्ट्र टाइम्स, टीआयएल नेटवर्क कडून