हायलाइट्स:

  • मसिह अलीनेजाद या इराणी पत्रकार आणि सामाजिक कार्यकर्त्या
  • हिजाबची महिलांवर केली जाणारी सक्ती त्यांनी धुडकावून लावली
  • #LetUsTalk म्हणत कट्टरतावाद्यांना खुलं आव्हान

तेहरान, इराण :

अफगाणिस्तानासहीत पश्चिम आशियातील अनेक देशांमध्ये मोठ्या संख्येनं महिलांवर ‘शरिया कायद्या’च्या स्वरुपात वेगवेगळ्या निर्बंध आणि अत्याचारांना सामोरं जावं लागतंय. यालाच आता महिलांनी खुलेपणानं विरोध सुरू केलाय. सोशल मीडियाचा आधार घेत महिलांनी तालिबानी कायद्यांविरोधात आपल्यावरच्या अन्यायाला वाचा फोडण्याचा प्रयत्न सुरू केलाय.

इराणी पत्रकार आणि सामाजिक कार्यकर्त्या मसिह अलीनेजाद यांनी स्वत:साठी आणि आपल्यासारख्याच इतर हजारो महिलांसाठी आवाज उठवला आहे. ‘शरिया कायद्यांतर्गत क्रूरतेचा सामना करणाऱ्या माझ्या सर्व भगिणी आता एकत्र आल्या आहेत’ असं म्हणत मसिह यांनी आपला एक व्हिडिओदेखील सोशल मीडियावर शेअर केला आहे. या व्हिडिओत हिजाबची महिलांवर केली जाणारी सक्ती त्यांनी धुडकावून लावलीय.

वाचा : Tonga Tragedy : हजारो वर्षांतला सर्वात भयंकर ज्वालामुखी, उद्ध्वस्त टोंगाचे PHOTO

Boxing champion Mohammad Javad: भ्रष्टाचाराचा विरोध महागात! बॉक्सरला मृत्यूदंडाच्या शिक्षेचं फर्मान
Anne Frank betrayal: १५ वर्षांची ‘अॅनी फ्रँक’ कुणामुळे नाझींच्या हाती लागली? ७७ वर्षानंतर रहस्य उलगडलं…
व्हिडिओत काही सेकंदांसाठी मसिह या हिजाब परिधान केलेल्या दिसत आहेत. ‘इस्लामिक रिपब्लिक, तालिबान आणि आयएसआयएस आपल्याला अशा प्रकारे पाहू इच्छितात’ असं त्यांनी आपल्या या रुपाविषयी म्हटलंय. त्यानंतर मात्र हिजाब काढून टाकत ‘हे माझं खरं रुप आहे’ असं त्यांनी म्हटलंय.

‘हिजाब काढला तर इराणमध्ये मला केसांसहीत टांगलं जाईल, शाळेतून हाकलून दिले जाईल, फटके मारले जातील, तुरुंगात टाकलं जाईल, दंड ठोठावला जाईल, रस्त्यावर पोलीस रोज मारहाण करतील आणि माझ्यावर बलात्कार झाला तरीही ती माझीच चूक असेल, अशा अनेक धमक्या दिल्या गेल्या. हिजाब काढला तर माझ्याच मातृभूमीत एखाद्या स्त्रीसारखं मी जगू शकणार नाही. पाश्चिमात्य देशांत मला सांगितलं गेलं की जर मी माझ्या कथा शेअर केल्या तर ‘इस्लामोफोबिया’साठी मीच जबाबदार असेल. मी मध्यपूर्वेतील एक महिला आहे. मला इस्लामिक कायद्यांची भीती वाटते. मी अनुभवलेल्या प्रत्येक क्रूरतेची मला भीती वाटते. फोबिया ही एक अतार्किक भीती आहे, पण माझ्या आणि मध्यपूर्वेतील अनेक महिलांच्या शरिया कायद्याखाली राहणाऱ्या त्यांच्या भीतीमागे एक तर्क आहे, चला बोलूया’ असं म्हणत त्यांनी महिलांनाही आवाहन केलंय.

‘तुम्हाला असे किती देश माहीत आहेत जिथं महिलांना हिजाब न घातल्यानं तुरुंगात टाकलं जातं किंवा फटके मारले जातात? हिजाबाच्या सक्तीविरोधात किमान पाच कार्यकर्ते तुरुंगात आहेत. सबा कोर्दफशारी केवळ २० वर्षांची होती, तिला २७ वर्षांचा तुरुंगवास आणि यास्मानला १६ वर्षांची शिक्षा सुनावण्यात आली’ अशा काही कहाण्यादेखील त्यांनी जगापुढे मांडल्यात.

हे एकविसावं शतक आहे आणि आम्हाला त्रास न होता मुक्तपणे जगायची इच्छा आहे. कोणत्याही सेन्सॉरशिपशिवाय कोणत्याही धर्मावर टीका करण्यासाठी आम्हाला स्वतंत्र व्हायचंय, असंही त्यांनी आपल्या ट्विटमध्ये म्हटलंय. मसिह यांनी आपल्या प्रत्येक ट्विटमध्ये #LetUsTalk हा हॅशटॅगही वापरलाय.

‘अलकायदा’ची पाकस्तानी दहशतवादी संघटनांशी हातमिळवणी, भारताचा गौप्यस्फोट
अजब-गजब: मृत्यू समोर उभा असतानाही महिला घेत होती ‘सेल्फी’

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here