मुंबई: करोना व्हायरसचा प्रभाव दिवसेंदिवस वाढतच असून महाराष्ट्रातील रुग्णसंख्येनं आतापर्यंत २०० चा आकडा पार केला आहे. पुढील धोका लक्षात घेऊन राज्य सरकारनं प्रतिबंधात्मक उपाययोजना कठोरपणे राबवण्याचा निर्णय घेतला आहे. जाणून घेऊया दिवसभरातील ताज्या घडामोडी…

लाइव्ह अपडेट्स:

>> राज्यात करोनामुळं मृत्यू झालेल्या रुग्णांची संख्या ९ वर

>> पुण्यात करोनाचा पहिला बळी, ५२ वर्षीय व्यक्तीचा खासगी रुग्णालयात उपचारादरम्यान मृत्यू

>> आज आढळले आणखी १२ रुग्ण; त्यात पुण्यातील ५, मुंबईतील ३, नागपूर दोन, नाशिक व कोल्हापुरातील प्रत्येकी एकाचा समावेश

>> राज्यातील करोनाग्रस्तांचा आकडा २१५ वर

>> औरंगाबादमधील न्याय नगरमध्ये काही लोकांनी रेशन दुकान फोडले!

वाचा:

>> आता आपल्याकडं वेळ आहे. त्या वेळेचा उपयोग भविष्यातील नियोजनासाठी करावा – शरद पवार

>> उधळपट्टी टाळण्याची काळजी घेतली नाही तर आर्थिक संकटाला तोंड द्यावं लागेल – शरद पवार

>> राज्य सरकार, महापालिका, नगरपालिका, जिल्हा परिषदा सर्वांवरच आर्थिक ताण पडणार आहे – शरद पवार

>> उत्पादकता वाढवावी लागेल – शरद पवार

>> आर्थिक स्थिती वाईट आहे. वैयक्तिक जीवनात काटकसरीनं राहावं लागेल. वायफळ खर्च टाळावे लागतील – शरद पवार

>> आपण काही गोष्टी शिकलोय. काही सवयी बदलायला हव्यात – शरद पवार

>> वैद्यकीय क्षेत्राच्या लौकिकाला धक्का लावणारी ही गोष्ट आहे. तुमचे दरवाजे बंद करू नका; पवारांचं डॉक्टरांना आवाहन

>> खासगी रुग्णालये व दवाखाने बंद राहणं हे अत्यंत गंभीर आहे – शरद पवार

>> लोक अजूनही बाहेर पडतात हे चिंताजनक – शरद पवार

>> राज्यातील सगळे मंत्री अहोरात्र काम करताहेत, त्यांना राज्याच्या प्रशासनाची उत्तम साथ मिळतेय – शरद पवार

>> शरद पवार यांचे फेसबुक लाइव्ह सुरू

>> कोल्हापूर: छत्रपती प्रमिलाराजे रुग्णालयातील विलगीकरण कक्षात ठेवलेल्या एका ६० वर्षीय संशयिताचा मृत्यू

>> कल्याण: इतर व्यवसाय बंद असल्याने अनेकजण भाजी विक्री व्यवसाय करू लागलेत

>> कल्याण: कल्याण कृषी उत्पन्न बाजार समितीत गाड्यांची आवक कमी, भाज्यांची आवक जास्त, भाज्यांचे भाव कोसळले!

>> कृषी उत्तपन्न बाजार समितीत गर्दी, सोशल डिस्टन्सिंगची ऐशीतैशी

>> पुणे: इंग्लंडवरून आलेल्या आणखी एकाला लागण… पुण्यात लागण झालेल्यांची संख्या ३१ वर

>> पुणे: खासगी रुग्णालयात उपचार घेणाऱ्या ४० वर्षांच्या व्यक्तीच्या संपर्कातील आणखी दोघांना करोनाची लागण

>> राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार आज सकाळी ११ वाजता फेसबुक लाइव्हद्वारे साधणार जनतेशी संवाद

वाचा:

>> उद्धव ठाकरे यांनी सर्वपक्षीय बैठक आयोजित करावी; रामदास आठवले यांची सूचना

>> राज्यातील करोनारुग्णांचा आकडा २०० पार; आतापर्यंत आठ जणांचा मृत्यू

Maharashtra News, Latest Maharashtra News in Marathi, ‎महाराष्ट्र ठळक बातम्या | Maharashtra Times

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here