हायलाइट्स:

  • लाहोरच्या गजबजलेल्या अनारकली बाजार परिसरात स्फोट
  • स्फोटात तीन जण ठार, तर २५ जखमी
  • हल्ल्यामागे तहरीक-ए-तालिबान पाकिस्तानचा हात?

लाहोर, पाकिस्तान :

आज (गुरुवारी) पुन्हा एकदा पाकिस्तान दहशतवादी हल्ल्यानं थरारलंय. पाकिस्तानातल्या पंजाब प्रांताची राजधानी लाहोर इथल्या अनारकली बाजारात झालेल्या स्फोटात तीन जण ठार झाल्याची प्राथमिक माहिती माहिती हाती येतेय. तर या स्फोटात २५ हून अधिक जण गंभीर जखमी झालेत.

गजबजलेल्या परिसरात स्फोट

अनारकली बाजारात घडवून आणण्यात आलेला स्फोट इतका तीव्र होता की त्यामुळे आजूबाजूच्या दुकानांच्या आणि इमारतींच्या खिडक्यांच्या काचाही फुटल्याचं समोर आलं. घटनास्थळी उभ्या असलेल्या अनेक मोटारसायकलींचंही स्फोटात नुकसान झालंय.

या स्फोटामुळे जमिनीत दीड फूट खोल खड्डा पडला. स्फोटाच्या कारणांचा शोध घेतला जातोय. आतापर्यंत कोणतीही ठोस माहिती हाती लागलेली नाही, असं लाहोरचे डीआयजी डॉ मुहम्मद आबिद खान यांनी जिओ न्यूजशी बोलताना म्हटलंय.

लाहोरचा अनारकली बाजार हा अतिशय गजबजलेला परिसर म्हणून ओळखला जातो. इथं दररोज लाखो लोक मार्केटिंगसाठी येतात. स्फोटाच्या वेळीही संपूर्ण बाजारपेठेत अनेक लोक उपस्थित होते.

स्फोटानंतर तत्काळ घटनास्थळी दाखल झालेल्या पोलिसांनी जखमींना मेयो रुग्णालयात हलवलं. जखमींपैकी चार जणांची प्रकृती चिंताजनक असल्याची माहिती रुग्णालयाच्या अधिकाऱ्यांनी दिलीय.

VIDEO: इराणी पत्रकारानं कॅमेऱ्यासमोर काढून फेकला हिजाब, कट्टरतावाद्यांना खुलं आव्हान
Boxing champion Mohammad Javad: भ्रष्टाचाराचा विरोध महागात! बॉक्सरला मृत्यूदंडाच्या शिक्षेचं फर्मान
हल्ल्यामागे टीटीपीचा हात?

या हल्ल्यामागे तहरीक-ए-तालिबान पाकिस्तान (टीटीपी) या दहशतवादी संघटनेचा हात असल्याची शक्यता वर्तवण्यात येतेय. काही दिवसांपूर्वी पाकिस्ताननं अफगाणिस्तानात घुसून टीटीपीच्या एका उच्चपदस्थ कमांडरची हत्या केली होती. या हत्येचा सूड म्हणून आजचा स्फोट घडवून आणण्यात आला असावा, अशी शक्यता व्यक्त केली जातेय.

जानेवारी महिन्यात पाकिस्तानकडून अफगाणिस्तानच्या नांगरहार प्रांतात टीटीपीचा प्रमुख दहशतवादी खालिद बाटली उर्फ मोहम्मद खुरासानी याला ठार करण्यात आलं होतं. ५० वर्षीय मोहम्मद खुरासानी हा टीटीपीचा प्रवक्तादेखील होता.

मॉरिशिअसमध्ये दाखल होणार ‘मेड इन इंडिया’ हेलिकॉप्टर!
केवळ राहुल नाही तर प्रियांका गांधीही ‘पेगासस’च्या शिकार, इस्रायली वृत्तपत्राचा गौप्यस्फोट

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here