हायलाइट्स:
- वानखेडे कुटुंबीय आणि नवाब मलिक यांच्यातील वाद अद्याप सुरूच
- समीर वानखेडेंचे वडील ज्ञानदेव यांनी घेतली मुंबई हायकोर्टात धाव
- नवाब मलिक यांच्याविरोधात दाखल केली अवमान याचिका
ज्ञानदेव वानखेडे यांनी नवाब मलिक यांच्याविरोधात अवमान याचिका दाखल केली आहे. कोर्टात हमी दिल्यानंतरही मलिक यांनी कथितरित्या त्यांच्या कुटुंबीयांविरोधात वक्तव्ये सुरूच ठेवली आहेत, असे त्यांनी याचिकेत म्हटले आहे. मलिक यांच्याद्वारे करण्यात आलेल्या उल्लंघनाबाबतचा उल्लेखही याचिकेत करण्यात आला आहे.
राणीच्या बागेत दुर्मिळ प्राणी विदेशातून आणण्याच्या निविदेत १०६ कोटींचा गैरप्रकार | मिहीर कोटेचा
आर्यन खान ड्रग्ज प्रकरणानंतर नवाब मलिक यांनी एनसीबीचे अधिकारी समीर वानखेडे यांच्यावर गंभीर आरोप केले होते. वानखेडे हे खंडणी वसुली करतात. त्यासाठी खोटी प्रकरणं उभी करतात. आर्यन खान, समीर खान यांच्यासह अन्य २६ प्रकरणांची यादीच मलिक यांनी जाहीर केली होती. ही सर्व प्रकरणे बोगस असून त्यातील साक्षीदार समीर वानखेडे यांच्या जवळचे आहेत, असा दावा मलिक यांनी केला होता. वानखेडे हे फ्रॉड असल्याचं सिद्ध करण्यासाठी मलिक यांनी केला होता. तसंच बनावट जात प्रमाणपत्राच्या आधारे नोकरी मिळवल्याचा दावाही मलिक यांनी केला होता.
मलिक यांच्या आरोपांमुळं वानखेडे कुटुंब चर्चेत होतं. वानखेडे कुटुंबीयांनी मलिक यांचे आरोप फेटाळल्यानंतरही मलिक नवनव्या गोष्टी पुढं आणत होते. त्यामुळं समीर वानखेडे यांचे वडील ज्ञानदेव वानखेडे यांनी मलिक यांच्याविरोधात अब्रुनुकसानीचा दावा दाखल केला होता. ‘मलिक हे रोज नवे निराधार जाहीर आरोप करून आमची बदनामी करत आहेत. त्यामुळं आमची प्रतिमा मलीन होत आहे. आमच्या विरोधात आक्षेपार्ह पोस्ट केल्या जात आहेत. याचा आम्हाला प्रचंड मानसिक त्रास होत आहे, असं त्यांनी अर्जात म्हटलं होतं.