हायलाइट्स:
- जिल्हा कारागृहात आणखी ११ कैदी करोना पॉझिटिव्ह
- करोनाबाधित कैद्यांचा आकडा पोहचला २४ वर
- उपचारासाठी मोहाडी रुग्णालयात केलं दाखल
जळगाव जिल्हा कारागृहात १२ जानेवारी रोजी १३ कैद्यांना करोनाची लागण झाली होती. अहवाल पॉझिटिव्ह असल्याचं स्पष्ट झाल्यानंतर सर्वांना मोहाडी येथील शासकीय रुग्णालयात दाखल करण्यात आलं आहे. त्यानंतर गुरुवारी पुन्हा ११ कैद्यांना कोरोनाची लागण झाल्याचे समोर आलं आहे.
दरम्यान, करोनाची लागण झालेल्या कैद्यांमध्ये बुधवारीच अटक करण्यात आलेल्या दोन संशयितांचा समावेश असल्याची माहिती मिळाली आहे.