हायलाइट्स:
- बिल गेटस् यांनी व्यक्त केली भविष्यातील महामारीबद्दल चिंता
- करोना विषाणूविरुद्ध लढण्यासाठी तसंच भविष्यात संभाव्य साथीच्या रोगांसाठी पूर्वतयारी
- ‘बिल आणि मेलानिया गेट्स फाऊंडेशन’कडून १५० दशलक्ष कोटींची मदत
अवघं जग करोना संकटाशी झुंजत असताना अनेक देशांना करोना परिस्थितीनं बेजार केलंय. त्यापैंकी सर्वात प्रभावित झालेली अमेरिकेची करोनाच्या भीतीनं अक्षरश: गाळण उडालीय. याच दरम्यान बिल गेट्स यांनी भविष्यातील जैविक संकटांबद्दल आणि महामारीबद्दल इशारा देताना ‘परिस्थिती आणखी उद्ध्वस्ततेकडे नेऊ शकते’, असा गर्भित इशाराच दिलाय.
‘मायक्रोसॉफ्ट’चे संस्थापक बिल गेट्स यांनी भविष्यातील महामारीबद्दल चिंता व्यक्त करताना हे वक्तव्य केलंय. ‘बिल आणि मेलानिया गेट्स फाऊंडेशन’नं ‘कोलिशन फॉर एपिडेमिक प्रिपेडनेस इनोव्हेशन‘ (CEPI) कडे १५० दशलक्ष डॉलर देणगी सोपवलीय. CEPI कडून या राशीचा वापर करोना विषाणूविरुद्ध लढण्यासाठी तसंच भविष्यात संभाव्य साथीच्या रोगांसाठी पूर्वतयारी करण्यासाठी करण्यात येईल, असं मंगळवारी जाहीर करण्यात आलं.
‘जग वेगानं विकसित होणाऱ्या विषाणूच्या आव्हानाला तोंड देतंय. अशा परिस्थितीत जीवरक्षक उपकरणांची गरज आता ‘तातडीची’ राहिलेली नाही’ असं वक्तव्यही यावेळी बिल गेटस् यांनी केलंय. लस निर्माण करण्यासाठीचा कालावधी १०० दिवसांहून कसा कमी करता येईल, याकडे CEPI लक्ष देणार आहे.
संशोधन आणि विकासामध्ये गुंतवणूक केल्यामुळे आपलं जीवन वाचवलं जाऊ शकतं आणि सर्वात भयंकर स्थिती उत्पन्न होण्यापासून रोखलं जाऊ शकतं हे आम्ही गेल्या २० वर्षांत शिकलोय, असं बिल गेटस यांनी यावेळी म्हटलंय. सोबतच, गेट्स यांनी जगभरातील सरकारांना भविष्यातील साथीच्या आजारांना रोखण्यासाठी सहकार्य करण्याचं आवाहन केलंय. ‘भविष्यात काही संभाव्य महामारींमुळे करोना विषाणूपेक्षाही भयंकर असं मृत्यूचं प्रमाण दिसून येऊ शकतं’ असा भीती वजा गर्भित इशारा गेटस् यांनी दिलाय.
Tonga Tragedy : हजारो वर्षांतला सर्वात भयंकर ज्वालामुखी, उद्ध्वस्त टोंगाचे PHOTO