हायलाइट्स:

  • कालीचरण महाराज यांच्या अडचणी आणखी वाढल्या
  • ठाणे पोलिसांनी रायपूर येथून केली अटक
  • महात्मा गांधी यांच्याविरोधात केले होते आक्षेपार्ह विधान
  • जितेंद्र आव्हाड यांनी दाखल केली होती तक्रार

ठाणे : महात्मा गांधी यांच्याविरोधात आक्षेपार्ह विधान करणाऱ्या कालीचरण महाराज (कालीचरण महाराज) यांना ठाणे येथील नौपाडा पोलिसांनी अटक केली आहे. कालीचरण महाराज यांना रायपूर येथून ताब्यात घेण्यात आले आहे. त्यानंतर त्यांना येथील कोर्टात हजर केले जाणार आहे. काही दिवसांपूर्वी ठाण्यातील नौपाडा पोलीस ठाण्यात राज्याचे गृहनिर्माण मंत्री डॉ. जितेंद्र आव्हाड यांनी त्यांच्याविरोधात तक्रार दाखल केली होती.

राष्ट्रपिता महात्मा गांधी यांच्याविरोधात आक्षेपार्ह आणि बेताल वक्तव्य करणाऱ्या कालीचरण महाराज यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात यावा, यासाठी राज्यातील विविध ठिकाणी तक्रारी दाखल झाल्या होत्या. त्याचबरोबर राज्याचे गृहनिर्माण मंत्री डॉ. जितेंद्र आव्हाड यांनी देखील या कालीचरण महाराज यांना अटक व्हावी यासाठी लेखी तक्रार केली होती. याच तक्रारीवरून कालीचरण यांना रायपूर येथून अटक करण्यात आली. कालीचरण महाराज यांनी राष्ट्रपिता महात्मा गांधी यांच्याविरोधात बेताल आणि आक्षेपार्ह विधाने केली होती. या कालीचरण महाराज यांना अटक करण्यात यावी, अशी लेखी तक्रार आव्हाड यांनी ठाण्यातील नौपाडा पोलीस ठाण्यात केली होती. या तक्रारीनंतर नौपाडा पोलिसांनी जयपूर येथून कालीचरण महाराज यांना ताब्यात घेतले. त्यांना कोर्टात हजर करण्यात येणार आहे.

कालीचरण महाराजांना अखेर बेड्या; रायपूर पोलिसांची भल्या पहाटे कारवाई
गांधींजींबद्दल अपशब्द वापरणारे कालीचरण महाराजांना पुण्यातील ‘हे’ भाषण भोवणार

रायपूर येथील धर्मसंसदेत वादग्रस्त वक्तव्य केल्यामुळे अडचणीत आलेल्या कालीचरण महाराजांवर पुण्यातील एका भाषणाच्या प्रकरणातही गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुण्यातील नातूबागेत १९ डिसेंबर रोजी झालेल्या शिवप्रताप दिन कार्यक्रमात त्यांनी धार्मिक तेढ वाढवणारी वक्तव्ये केली होती. त्या प्रकरणी कालीचरण व मिलिंद एकबोटे यांच्यासह पाच जणांवर गुन्हा दाखल झाला होता. आता ठाणे पोलिसांनीही कालीचरण यांना अटक केल्याने त्यांच्या अडचणी आणखी वाढल्या आहेत.

Mumbai News : चुकीचे इंजेक्शन दिल्यामुळे २ वर्षांच्या मुलाचा मृत्यू

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here