हायलाइट्स:

  • सिंधुदुर्गमध्ये भाजप-शिवसेना कार्यकर्ते आमनेसामने
  • जमावबंदी आदेश उल्लंघनप्रकरणी शिवसेना आमदार वैभव नाईक यांच्यावर गुन्हा
  • शिवसेनेच्या २५-३० कार्यकर्त्यांविरोधात कुडाळ पोलिसांनी दाखल केला गुन्हा
  • भाजपच्या पदाधिकारी, कार्यकर्त्यांवरही दाखल केले गुन्हे

सिंधुदुर्ग: शिवसेनेचे आमदार वैभव नाईक यांच्यासह शिवसेनेच्या २५ ते ३० कार्यकर्त्यांविरोधात कुडाळ पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे. याशिवाय भाजपच्याही २०-३० कार्यकर्त्यांवर गुन्हा दाखल केला आहे. कुडाळ नगरपंचायत निवडणूक निकालानंतर कार्यकर्त्यांचा जमाव करून घोषणाबाजी केली. जिल्हाधिकाऱ्यांच्या आदेशांचे उल्लंघन केल्याप्रकरणी ही कारवाई केली आहे.

कुडाळ नगरपंचायत निवडणुकीचा निकाल जाहीर झाल्यानंतर शिवसेना आणि भाजपनेही मिरवणूक काढली होती. या मिरवणुकीदरम्यान दोन्ही पक्षांच्या कार्यकर्त्यांनी एकमेकांविरोधात जोरदार घोषणाबाजी केली होती. बेकायदा गर्दी जमवून जिल्हाधिकाऱ्यांच्या आदेशांचे उल्लंघन केल्याप्रकरणी कुडाळ पोलिसांनी कारवाई केली. कुडाळ पोलिसांनी शिवसेना आमदार वैभव नाईक यांच्यासह शिवसेनेचे २५ ते ३० कार्यकर्ते आणि भाजपच्याही २०-३० कार्यकर्त्यांविरोधात गुन्हा दाखल केला.

शिवसेना आमदार वैभव नाईक यांच्यासह भाजप पदाधिकाऱ्यांवर गुन्हा दाखल

आमचं सरकार आल्यावर काय होईल याचा विचार करा; आम्ही तर दयामायाही दाखवत नाही: निलेश राणे

सिंधुदुर्ग जिल्ह्यात जिल्हाधिकाऱ्यांच्या आदेशानुसार, जमावबंदी लागू करण्यात आली आहे. या जिल्हाधिकाऱ्यांच्या आदेशाचे उल्लंघन केल्याप्रकरणी शिवसेना आणि भाजप कार्यकर्त्यांविरोधात भादंवि कलम १८८, २६९ आणि २७० अन्वये, तसेच आपत्ती व्यवस्थापन अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. कुडाळ पोलिसांच्या माहितीनुसार, निवडणूक निकाल घोषित झाल्यानंतर शिवसेनेचे पदाधिकारी आणि कार्यकर्ते पायी जात शिवसेना कार्यालयाकडे जात होते. त्याचवेळी घोषणाबाजी करण्यात येत होती. पाचपेक्षा अधिक लोकांची गर्दी जमवल्याप्रकरणी आमदार वैभव नाईक आणि २५ ते ३० कार्यकर्त्यांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे. दुसरीकडे, भाजपचे अनेक पदाधिकारी आणि कार्यकर्ते पोस्ट नाका येथे जमले. जिल्हाधिकाऱ्यांच्या आदेशाचे उल्लंघन केल्याने त्यांच्याविरोधात कुडाळ पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल केला. कुडाळमध्ये कायदा आणि सुरक्षाव्यवस्था राखण्यात यावी, अशा सूचना वरिष्ठांनी पोलीस अधिकाऱ्यांना दिल्या. शहरात कोणताही अनुचित प्रकार घडू नये यासाठी पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला होता.

Kudal Nagar Panchayat: कुडाळची सत्ता राखण्यासाठी भाजपचा अनपेक्षित डाव, शिवसेनेला सत्तेपासून दूर ठेवण्यासाठी काँग्रेसशी हातमिळवणी?

कुडाळमध्ये शिवसेनेच्या रॅलीला भाजपचा विरोध, कार्यकर्ते भिडले

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here