हायलाइट्स:

  • उल्हासनगरात रिक्षाचालक मोबाइल हिसकावून पसार
  • रस्त्याने पायी जाणारा तरूण हादरलाच
  • कॅम्प ३ मधील घटना सीसीटीव्हीत कैद

उल्हासनगर : उल्हासनगरमध्ये सध्या चोरीच्या घटना वाढल्या आहेत. रस्त्यावरून पायी जाणाऱ्या महिलांकडील सोन्याचे दागिने किंवा त्यांच्याकडील रोकड लुटण्याच्या घटना घडत आहेत. दुचाकीवरून भरधाव येऊन महिलांकडील दागिने हिसकावून पोबारा केल्याच्या घटना याआधी घडलेल्या आहेत. पण आता चक्क एका रिक्षाचालकाने ‘धूमस्टाइल’ चोरी केल्याचा प्रकार घडला आहे.

उल्हासनगरमध्ये चोरीचा अजब प्रकार उघडकीस आला आहे. एका रिक्षाचालकानेच ही चोरी केली आहे. चालकाने रिक्षा भरधाव नेत एका पादचाऱ्याकडील मोबाइल हिसकावला आणि पसार झाला. हा सगळा प्रकार सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झाला आहे. या प्रकरणी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू आहे, अशी माहिती मिळाली. उल्हासनगरच्या कॅम्प तीनमधील गणेश नगर परिसरात हा प्रकार घडलाय.

Kalicharan Maharaj : कालीचरण महाराज यांना ठाणे पोलिसांनी केली अटक, कोर्टात हजर करणार
तीन किलो सोन्याचा ‘कंबर पट्टा’ घेऊन तो नागपूरला येत होता! पण…

कॅम्प ३ मधील गणेश नगर परिसरात एका पादचाऱ्याचा मोबाइल चोरीला गेला. रिक्षाचालकाने ही चोरी केली. त्याने रिक्षा वेगाने आणली आणि पायी जाणाऱ्या तरुणाकडील मोबाइल हिसकावला. काही कळायच्या आत तो रिक्षाचालक तेथून पसार झाला. एक तरूण गणेश नगर परिसरातील रस्त्याने पायी जात होता. त्याच्या हातात मोबाइल होता. अचानक पाठीमागून रिक्षा आली. त्या रिक्षामधील चालकाने या तरुणाच्या हातातील मोबाइल हिसकावला आणि रिक्षा वेगाने पुढे नेली. या तरूणाने आरडाओरडा केला. त्या रिक्षाचा पाठलाग केला. मात्र, तो रिक्षाचालक पसार झाला. हा सर्व धक्कादायक प्रकार सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झाला आहे. या प्रकरणी उल्हासनगरच्या मध्यवर्ती पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू होती.

Bulli Bai app : बुल्लीबाई अॅप प्रकरणात MBA पदवीधारक तरूणाला अटक; धक्कादायक माहिती उघड
chain snatcher: त्याने देशभरातून चोरल्या सोनसाखळ्या आणि अखेर डोंबिवलीत फिल्मी स्टाइलने…

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here