नवी दिल्ली : इंडिया गेटवरील अमर जवान ज्योत राष्ट्रीय युद्ध स्मारकात विलीन केली जात असताना दुसरीकडे तिथे आता नेताजी सुभाष चंद्र बोस यांचा भव्य पूर्णाकृती पुतळा उभारण्यात ( netaji सुभाषचंद्र बोसचा भव्य पुतळा ) येणार आहे. पंतप्रधान मोदींनी स्वतः ट्विट करून याची माहिती दिली.

‘सध्या संपूर्ण देश नेताजी सुभाषचंद्र बोस यांची १२५वी जयंती साजरी करत आहे. आता इंडिया गेटवर ग्रॅनाइटपासून बनवलेला त्यांचा भव्य पूर्णाकृती पुतळा बसवला जाणार आहे, हे कळवताना मला अतिशय आनंद होत आहे. नेताजींबद्दल भारताच्या कृतज्ञतेचे हे प्रतीक असेल’, असे पंतप्रधान मोदी ट्विटमध्ये म्हणाले. पंतप्रधान मोदींनी पुतळ्याचा फोटोही ट्विट केला.
जॉर्ज पंचम यांच्या जागी उभारणार नेताजींचा भव्य पुतळा

नेताजींचा पुतळा पूर्ण होईपर्यंत नेताजींचा होलोग्राम पुतळा इंडिया गेटवर असेल. नेताजींच्या १२५ व्या जयंतीनिमित्त पंतप्रधान नरेंद्र मोदी २३ जानेवारीला या पुतळ्याचे अनावरण करणार आहेत. सुभाषचंद्र बोस यांचा पुतळा इंडिया गेट आणि राष्ट्रीय युद्ध स्मारक दरम्यान रिकाम्या छताखाली ठेवला जाईल. ६० च्या दशकात जॉर्ज पंचमचा पुतळा इथे होता. जो हटवण्याता आला असून कोरोनेशन पार्कमध्ये पाठवला गेला आहे.

( इंडिया गेटवर सध्या दिसेल नेताजींचा हा होलोग्राम पुतळा )

नेताजींच्या जयंतीपासून प्रजासत्ताक दिनाचा सोहळा सुरू होणार आहे. प्रजासत्ताक दिनाचा सोहळा आता दरवर्षी २४ जानेवारी ऐवजी २३ जानेवारीला सुरू होईल, असे अलिकडेच मोदी सरकारने ठरवले होते. स्वातंत्र्यसैनिक सुभाषचंद्र बोस यांची जयंती या सोहळ्यांमध्ये समाविष्ट करण्यात येणार आहे. यापूर्वी बोस यांची जयंती ‘पराक्रम दिवस’ म्हणून साजरी केली जाऊ लागली होती.

amar jawan jyoti : ५० वर्षे जुनी परंपरा बदलणार! अमर जवान ज्योत विझणार? केंद्राचे स्पष्टीकरण

देशभरात भाजपच्या कार्यक्रमांचे आयोजन

भाजपने आपल्या सर्व राज्य संघटनांना २३ जानेवारीला सुभाषचंद्र बोस जयंतीनिमित्त आपापल्या राज्यांमध्ये कार्यक्रम आयोजित करण्यास सांगितले आहे. देशभरात आयोजित कार्यक्रमांमध्ये आझाद हिंद फौजेच्या घोषणांचे स्मरण करण्यासाठी तरुण ठिकठिकाणी जमतील आणि त्यांची थीम गीतेही गायली जातील. नेताजींशी संबंधित शहरांमध्येही विशेष कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे.

PM Modi: पंतप्रधान मोदींचे महत्त्वाचे विधान; ‘भेदभावाला थारा न देणारी यंत्रणाच…’

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here