औरंगाबाद : मराठवाड्यासह महाराष्ट्रात खळबळ उडवून देणाऱ्या ‘तीस-तीस’ घोटाळ्याचा मुख्य आरोपी संतोष राठोडला औरंगाबाद ग्रामीण पोलिसांनी अखेर बेड्या ठोकल्या आहेत. शुक्रवारी एका तक्रारदाराने दिलेल्या तक्रारीनंतर औरंगाबाद ग्रामीण पोलिसांनी त्याला त्याच्या कन्नड येथील घरातून ताब्यात घेतलं आहे.

आकर्षक परतावा देण्याचे आमिष दाखवून शेकडो शेतकऱ्यांची फसवणूक करणाऱ्या राठोड विरोधात शुक्रवारी दौलत राठोड नावाच्या व्यक्तीने आपली ३३ लाखांची फसवणूक केल्याची तक्रार दिली होती. ज्यात कृष्णा एकनाथ राठोड आणि पंकज शेषेराव चव्‍हाण यांनी संतोष राठोड याच्या तीस-तीस योजनेत पैसे टाकल्याचे सांगून,यावर आकर्षक परतावा देण्याचे आमिष दाखवले होते. मात्र वर्ष उलटत आले पैसे परत मिळत नसल्याने दौलत राठोड यांनी तक्रार दिली.

सावधान! करोनामुळे पुढील ३० वर्षात ‘हा’ आजार तिपटीने वाढणार, थेट मेंदुवर होणार परिणाम

गुन्हा दाखल होताच बिडकीन पोलिसांनी संतोष राठोडचा शोध घेतला असता तो आपल्या कन्नड तालुक्यातील मुंडवाडी तांडा येथे असल्याची माहिती मिळाली. त्यानंतर लगेच कन्नड पोलिसांना याची माहिती देण्यात आली. यावरून कन्नड पोलिसांनी संतोष राठोड याच्या घराला घेरा घालत त्याला ताब्यात घेतलं. त्यानंतर रात्री त्याला बिडकीन पोलीस ठाण्यात हजर करत अटक करण्यात आली आहे. तर आज राठोड याला न्यायालयात हजर करण्याची शक्यता आहे.

काय आहे तीस-तीस घोटाळा…..

मराठवाड्यात समृद्धी महामार्ग आणि डीएमआयसी या प्रकल्पात शेकडो शेतकऱ्यांची जमीन गेली होती. ज्याचा कोट्यवधी रुपयांचा मोबदला या शेतकऱ्यांना मिळाला होता. हेच लक्षात घेत औरंगाबाद जिल्ह्यातील कन्नड तालुक्यातील संतोष राठोड नावाच्या तरुणाने या शेतकऱ्यांना माझ्याकडे पैसे गुंतवा आणि मासिक ३० टक्के परतावा मिळावा अशी योजना आणली. सुरवातीला काही नातेवाईकांना या योजनेत घेऊन त्यांना चांगला परतावा देत राठोड याने स्वतःची मार्केटिंग केली.

गावात आलिशान गाड्यांचा ताफा,पोते भरून लोकांना पैसे परत करणे हे सर्व चित्र निर्माण करत राठोड चर्चेत आला आणि पाहता पाहता लोकांनी घरदार,जमिनी, प्लॉट विकून राठोड कडे पैसे गुंतवले. मात्र गेल्या वर्षभरापासून व्याज सोडा मुद्दल सुध्दा लोकांना परत मिळाले नाहीत. त्यामुळे अखेर गुंतवणूकदारांकडून गुन्हे दाखल।करण्यात येत आहे.

होम क्वारंटाईनबद्दल धक्कादायक माहिती उघड, राज्यात तब्बल १०७५ रुग्णांचा जीव धोक्यात

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here