हायलाइट्स:

  • ज्येष्ठ रंगकर्मी कीर्ती शिलेदार यांचं पुण्यात निधन
  • वयाच्या ७० व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास
  • तब्बल ६० वर्षे रंगभूमीवर होत्या कार्यरत

म. टा. प्रतिनिधी । पुणे

संगीत नाटकाला ध्यास व श्वास मानून गेली ६० वर्षे अव्याहतपणे रंगभूमीची सेवा करणाऱ्या ज्येष्ठ रंगकर्मी, गायिका विदुषी कीर्ती शिलेदार (Kirti Shiledar) यांचं आज सकाळी आकस्मिक निधन झालं. त्या ७० वर्षांच्या होत्या. अस्वस्थ वाटू लागल्यानंतर सकाळी त्यांना उपचारासाठी दीनानाथ मंगेशकर रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. तिथं उपचारादरम्यान त्यांची प्राणज्योत मालवली.

वाचा: कीर्ती शिलेदार यांचा नाट्यप्रवास त्यांच्याच शब्दांत

वयाच्या दहाव्या वर्षी कीर्ती शिलेदार यांनी रंगभूमीवर पहिलं पाऊल ठेवलं. त्यानंतर त्यांनी मागे वळून पाहिलंच नाही. मागील ६० वर्षांत आपल्या चतुरस्र अभिनयानाने व गायनाने त्यांनी रंगभूमीवर स्वत:चा ठसा उमटवला होता. जयराम आणि जयमाला शिलेदार या दाम्पत्याच्या पोटी जन्मलेल्या कीर्ती शिलेदार यांनी मराठी रंगभूमीसाठी बहुमूल्य योगदान दिले. संगीत रंगभूमी पुन्हा जोमाने बहरून येईल असा विश्वास त्या नेहमी व्यक्त करायच्या. २०१८ साली पार पडलेल्या ९८ व्या अखिल भारतीय मराठी नाट्य संमेलनाचे अध्यक्षपद त्यांनी भूषविले होते. काही वेळात वैकुंठ स्मशानभूमीत अंत्यसंस्कार करण्यात येणार आहेत.

Kirti-Shiledar

कीर्ती शिलेदार

वाचा: …म्हणून मी नथुराम गोडसेंची भूमिका केली; अमोल कोल्हेंनी सगळं काही सांगितलं!

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here