हायलाइट्स:

  • मुंबईत ताडदेव परिसरात २० मजली इमारतीत भीषण आग
  • या भीषण आगीत १५ जण जखमी, २ जणांचा होरपळून मृत्यू
  • रुग्णांना नजीकच्या रुग्णालयात केले दाखल
  • अग्निशमन दलाचे कर्मचारी १३ बंबांसह घटनास्थळी

मुंबई: देशाची आर्थिक राजधानी मुंबईच्या (Mumbai) ताडदेव परिसरात आज सकाळी साडेसातच्या सुमारास एका २० मजली इमारतीत भीषण आग लागली. अग्निशमन दलाच्या माहितीनुसार, या इमारतीच्या १८व्या मजल्यावर ही आग लागली. या आगीत १५ जण जखमी झाले आहेत. तर दोन जणांचा मृत्यू झाला आहे. जखमींना भाटिया रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, नाना चौक गवालिया टँक येथील २० मजली कमला इमारतीत आज सकाळी भीषण आग लागली. साधारण साडेसातच्या सुमारास ही दुर्घटना घडली. इमारतीच्या १८व्या मजल्यावर ही आग लागली असून, त्यात १५ जण जखमी झाले आहेत. तर दोन जणांचा मृत्यू झाल्याची माहिती आहे. जखमींना जवळच्याच भाटिया रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले आहे.

रेल्वे कर्मचारी आक्रमक;वर्कशॉपमधील कामगाराचा अपघाती मृत्यूने संताप
आता दोन सत्रांत लसीकरण;प्रौढांना सकाळी, मुलांना दुपारी लस देणार

घटनेची माहिती मिळाल्यानंतर अग्निशमन दलाचे कर्मचारी १३ अग्निशमन बंब, ७ जम्बो टँकरसह घटनास्थळी पोहोचले. कर्मचाऱ्यांनी आगीवर नियंत्रण मिळवण्यासाठी प्रयत्न सुरू केले आहेत. पालिकेच्या आपत्कालीन व्यवस्थापन विभागाने ही माहिती दिली.

भाटिया रुग्णालय व्यवस्थापनाने दिलेल्या माहितीनुसार, १५ जण जखमी झाले असून, त्यापैकी १२ जणांना जनरल वॉर्डात दाखल केले आहे. त्यांची प्रकृती स्थिर आहे. तर तीन जणांना आयसीयूमध्ये दाखल करण्यात आले आहे. त्यांची प्रकृती गंभीर आहे.

आयसीयू रुग्णांत अल्प वाढ, मुंबईत ५००८ रुग्णांची नोंद

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here