बीड : भाजप आमदार नमिता मुंदडा या त्यांच्या परिवारासह उसाचा रस पिण्यासाठी रसवंती वर गेल्या असता, मद्यधुंद असलेल्या सहा जणांनी त्यांच्या शिपायाच्या गळ्याला चाकू लावून लुटलं आहे. तर यादरम्यान आरडाओरड कानावर येताच, सोडविण्यास गेलेल्या आमदार पती मुंदडा यांना देखील खल्लास करून टाकण्याची धमकी देण्यात आलीय. ही खळबळजनक घटना बीडच्या अंबाजोगाई शहरात घडली आहे.

मुराजी प्रकाश साखरे असे आ. नमिता मुंदडा यांच्या शिपायाचे नाव आहे. त्याने दिलेल्या तक्रारीत म्हटलंय, की आज सायंकाळी ५ च्या दरम्यान आ. नमिता मुंदडा, पती अक्षय मुंदडा हे रस पिण्यासाठी बीड रोडवरील एका रसवंतीमध्ये गेले होते. यावेळी मुराजी रस पिऊन रसवंतीच्या बाहेर आला असता, त्याच वेळी शेजारच्या हॉटेलमधून लखन भाकरे रा. अंबाजोगाई हा अन्य ५ जणांसोबत तिथे आला. त्याने मुराजीच्या गळ्याला चाकू लावून दिड तोळ्याचे सोन्याचे लॉकेट आणि ६ हजार ४०० रुपये जबरदस्तीने काढून घेतले आणि साथीदारांकडे दिले.
पटोलेंनी ज्या ‘मोदी’वर टीका केली तो अखेर आला समोर, पत्रकार परिषद घेत म्हणाला…
यावेळी मुराजीचा आरडाओरडा ऐकून अक्षय मुंदडा आणि अन्य काहीजण धावत आले आणि त्यांनी लखन भाकरे याला पकडले. यादरम्यान त्याचे साथीदार शेजारच्या शेतात पळून गेले. यावेळी लखनने “अक्षय मुंदडा यांना मला सोड नाहीतर तुला खल्लास करून टाकीन, अख्ख्या अंबाजोगाईत माझी दहशत आहे”, अशी धमकी दिली. त्यानंतर अक्षय मुंदडा यांनी फोन करून पोलिसांना बोलावून घेतले आणि लखनला त्यांच्या हवाली केले. असं शिपाई मुराजी यांनी तक्रारीत नमूद केलंय. दरम्यान याप्रकरणी अंबाजोगाई शहर ठाण्यात लखन भाकरे आणि अन्य ५ जणांवर कलम ३९५, ३९७ नुसार गुन्हा दाखल करण्यात आला. दरम्यान या घटनेने पुन्हा एकदा बीड जिल्ह्यातील गुंडाराज आणि त्यांची दहशत समोर आली आहे.

सावधान! करोनामुळे पुढील ३० वर्षात ‘हा’ आजार तिपटीने वाढणार, थेट मेंदुवर होणार परिणाम

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here